इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषक 2022 च्या सुपर 4 चा तिसरा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबईमध्ये खेळला जाणार आहे. आशिया चषकाच्या या मोसमातील भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो शेवटचाही ठरू शकतो. याआधी श्रीलंकेने सुपर 4 मधील पहिला सामना जिंकला होता आणि भारतीय संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. अशा स्थितीत हा सामना रंजक ठरणार आहे. दिग्गज स्टार्सनी सजलेल्या टीम इंडियावर दडपण असेल, तर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या विजयाकडे पाहत असेल. अशा परिस्थितीत, भारत विरुद्ध श्रीलंका सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता हे आपण जाणून घ्या.
भारत विरुद्ध श्रीलंका एशिया कप 2022 सुपर 4 सामना, आज मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया चषकाच्या 15 व्या मोसमातील सुपर 4 मधील हा तिसरा सामना आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. दुबईत नाणेफेकीची वेळ साडेपाचची आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका आशिया चषक 2022 सुपर 4 च्या या मोठ्या आणि कठीण सामन्याचा तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर आनंद घेऊ शकता, तर हा सामना डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर भारत विरुद्ध श्रीलंका आशिया चषक सुपर 4 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असल्यास, तुम्ही ते डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर मॅच लाईव्ह पाहण्यासाठी हॉटस्टार वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
India vs Sri Lanka Asia Cup 2022 Super 4 Match