India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकमध्ये रंगणार भारतातील प्रथम नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022

India Darpan by India Darpan
September 6, 2022
in Uncategorized
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांचा नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022 चे आयोजन नाशकात करण्यात आले आहे. विश्वास ग्रृप व गीतगुंजन प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी विश्वास गार्डन, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे शुभहस्ते व विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास  ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील 60 हून अधिक गायक-कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एकूण 126 गाणी सादर होणार आहेत. गाणी एकत्रितपणे व सलग न सादर होता, ती सहा वेगवेगळ्या थीमवर आधारीत असणार आहे.

यामध्ये सकाळी 9 ते 11 अनमोल रतन, सकाळी 11 ते 1 जीना यहॉ मरना यहाँ, दुपारी 1 ते 3 हिटस् ऑफ 90, दु. 3 ते 5 दर्द ए किशोर, सायं 5 ते 7 फिल्मी गझल, संध्या 7 ते 10 हिटस् ऑफ आर.डी. बर्मन या क्रमाने होणार आहेत. गीतगुंजन म्युझिकल परिवार, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संगीत शौकीनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख श्री. विश्वास ठाकूर व गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे श्री. भुषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी केले आहे.

India’s First Non Stop Musical Marathon Will be in Nashik


Tags: EntertainmentMarathonMusicMusicalNashikNon Stop
Previous Post

‘या माणसामुळे माझे सिनेमे चालत नाहीत’, अक्षय कुमारने केला थेट गंभीर आरोप

Next Post

टीम इंडियासाठी आज ‘करो किंवा मरो’; आशिया चषकात श्रीलंकेशी मुकाबला

Next Post

टीम इंडियासाठी आज 'करो किंवा मरो'; आशिया चषकात श्रीलंकेशी मुकाबला

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023

भारतीय रेल्वेने केले वेळापत्रक प्रसिद्ध, या संकेतस्थळावर उपलब्ध

October 3, 2023
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू, पहा सर्व महत्वाच्या तारखा

October 3, 2023

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्याकडे दिली जबाबदारी

October 3, 2023

दिंडोरी पोलिसांना तुरी देऊन फरार झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीनेही केली आत्महत्या…

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group