बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दसरा मेळावा कुठे होणार? आदित्य ठाकरे म्हणाले….

by Gautam Sancheti
सप्टेंबर 6, 2022 | 4:21 pm
in संमिश्र वार्ता
0
aditya thackeray 2 e1658480643618

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. हा मेळावा शिवतीर्थवर करण्यावर शिवसेना ठाम आहे. या मेळाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मत व्यक्त करताच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला पुन्हा खोके सरकार म्हणून हिणवले आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहे. आता हे आरोप – प्रत्यारोप दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन सुरु आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. त्यामुळे शिवतीर्थवरच दसऱ्याचा कार्यक्रम होणार, तिथे खोके सरकार येऊ शकणार नाही असे विधान आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या सम्राट या मंडळातील बाप्पाच्या दर्शनाला आल्यावर केले आहे.

दसरा मेळाव्यावरुन आरपीआयचे रामदास आठवले यांनी शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यावरुन बीबीसी मैदानाचा पर्याय सांगितला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी इतरांना दसरा मेळाव्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत त्यांना फटकारले आहे. तर महाराष्ट्राची आणि शिवसेनेची संस्कृती ही शिवतीर्थावरच दसरा मेळाव्याची आहे. त्यामुळे ही परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच आरोग्य मंत्र्यांना हाफकीन ही एक संस्था आहे की दलाल हे देखील माहिती नाही. यावरुन शिंदे सरकारमधील मंत्री कसा कारभार करीत असतील असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर दुसऱ्या एका मंत्र्याने पद घेतले आहे, बंगलाही घेतला आहे पण प्रत्यक्षात कामाला आणखी सुरुवातच केलेली नाही. हा सर्व भोंगळ कारभार असून तो जनतेला देखील न पटणारा असल्याचे ते म्हणाले आहेत.

“दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु आहे आणि याचा त्रास अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिले असे अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना खोके सरकारमधून दिवसाला एक पत्र दिले जात आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सेना मागे सरकणार नाही”, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Yuva Sena Chief Aditya Thackeray on Dasara Melava Politics Shivsena

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टीव्हीच्या आवाजावरुन कडाक्याचे भांडण; सूनेने घेतला सासूच्या हाताचा चावा

Next Post

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाची राज्यभरात चर्चा; का? असं काय म्हणाले ते?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Girish Bapat
संमिश्र वार्ता

‘हो, मी नाराज आहे’, खासदार गिरीश बापट असे का म्हणाले?

सप्टेंबर 7, 2022
Eknath Shinde Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती? एकनाथ शिंदेंनी म्हणाले…

सप्टेंबर 6, 2022
Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत फडणवीस यांनी केली ही मोठी घोषणा

सप्टेंबर 6, 2022
eknath shinde devendra fadanvis e1657195561981
मुख्य बातमी

अमित शहा परतताच मध्यरात्री शिंदे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; तब्बल ३ तास खलबतं, काय झाली चर्चा?

सप्टेंबर 6, 2022
Next Post
Tanaji Sawant

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाची राज्यभरात चर्चा; का? असं काय म्हणाले ते?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011