व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती? एकनाथ शिंदेंनी म्हणाले…

India Darpan by India Darpan
September 6, 2022 | 8:50 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा दसरा मेळावा सध्या वादात आहे. पक्ष संघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली असून मुख्यमंत्री शिंदेंनी यावर उत्तर दिले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित असतील यासंबंधी तर्क-वितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आधी आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत व आपणच शिवसेना असल्याने दसरा मेळावा घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तसेच यासाठी तयारीला लागण्याचा आदेश सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करतील, असेही त्यावेळी ठरले होते.

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का, असं विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “अजून गणपती विसर्जन झालेलं नाही, त्यानंतर पितृ पंधरवडा, नवरात्री आणि नंतर दसरा आहे. सगळं आताच कसं सांगणार? त्याला फार अवधी आहे. मधल्या काळात अनेक गोष्टी होत असतात”.

राज ठाकरेंशी जुने संबंध
गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी १ सप्टेंबरला ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ‘‘ही भेट गणपती दर्शनासाठी होती. राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याच वेळी अंतिम होईल’’, असं शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे – ठाकरे भेटीनंतर सांगितलं होतं.

मेळाव्याला अद्याप महापालिकेकडून परवानगी नाही
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदाही मेळाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महापालिकेकडून परवानगीसाठी चालढकल करण्यात येत असल्याने ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात अडचणी येणार, हे स्पष्ट झालं आहे.

Eknath Shinde Dasara Melava Raj Thackeray Presence


Tags: Dasara MelavaEknath ShindePresenceRaj ThackerayShivsena
Previous Post

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत फडणवीस यांनी केली ही मोठी घोषणा

Next Post

बिगुल वाजला! राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post
प्रातिनिधीक फोटो

बिगुल वाजला! राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.