येवला – येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथील शेतजमिनीस पत्नीला वारस लावून जमीन हडपण्या-या तलाठी अतुल थुल यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. २२ डिसेंबर २०२१ रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो फरार होता. शनिवारी तालुका पोलिसांनी थूल यास शहरातून अटक करुन न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.हडपसावरगाव येथील शेतजमिनीस पत्नीला वारस लावून जमीन हाडपण्याबरोबरच शासकीय अनुदान पत्नीच्या नावाने हडप केल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे तलाठी अतुल थूल याच्या विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.