इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी करणारे महंत सिध्देश्वरानंद सरस्वती महाराज यांच्याशी आज इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी संवाद साधला. नाशिक धर्मनगरी आहे. त्यामुळे या निवडणुकीत तीन ते चार संत या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यात महंत सिध्देश्वरानंद सरस्वती महाराज सुध्दा आहे. त्यामुळे आज त्यांची उमेदवारी करण्यामागील भूमिका, त्यांचा प्रचार याबरोबरच त्यांनी आतपर्यंत केलेले समाजकार्य याबद्दलची माहिती जाणून घेतली.
या मुलाखतीत महंतांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे. पण, हिंदी पट्टा सोडला तर या ठिकाणाहून संत निवडून गेल्याचे फारसे दिसले नाही. असं का या प्रश्नालाही त्यांनी उत्तरे दिली. तर बघू महंत सिध्देश्वरानंद सरस्वती महाराज यांची विशेष मुलाखत…