इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
मग असेच करा ना
तुमच्या नजरेसमोरचा भविष्यकाळ अजून तुमच्या हाती आलेला नाही. तो तसा तुमच्या हाती कधी येणार की नाही हे तरी कोण सांगू शकेल? समजा आला, तर तो कदाचित् अगदी अनोळखी, वेगळेच रूप घेऊन येणार नाही कशावरून? मग असेच करा ना : जे काही तुमच्या दृष्टीपासून दूर ठेवण्याची परमेश्वराची इच्छा दिसत आहे, तिकडे तुम्हीच आपणहून डोळेझांक करा. आपण डोळ्यासमोर काही दिसत नसतांनाच त्या निराकार परमेश्वराची पूजा कर्मपुष्पांनी करू या. चित्त स्थिर, शांत ठेवू या. आंतर-बाह्य मौन स्वीकारून वर्तमानातील आपल्या कर्तव्यकर्मात गढून राहू या.