आपली रास मिथुन आहे का? २०२३ हे वर्ष असं जाईल
वाचकांच्या आग्रहास्तव आपण सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात जाणून घेत आहोत. वृश्चिक आणि कुंभ राशीविषयी आपण माहिती घेतली. आज आपण मिथुन या राशीविषयी जाणून घेणार आहोत…
मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या व्यक्तींच्या नावाचे अद्याक्षर का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह आहेत त्यांची रास मिथुन आहे. चला, तर वेळ न दवडता आपण मिथुन राशीसाठी नवेवर्ष कसे असेल ते जाणून घेऊया…
१) मागील वर्षात केलेली गुंतवणूक यंदा भरपूर फायदा देऊन जाणार आहे.
२) यंदाच्या वर्षाचे विशेष म्हणजे परदेश गमनाची संधी आपणास मिळणार आहे.
३) आपल्याबाबत झालेले गैरसमज, त्यातून आपला झालेला तोटा यंदाच्या वर्षी भरून निघेल..
४) विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एमबीए, मार्केटिंग, फायनान्स, एचआर, कंपनी सीएस, सीए याकडे विशेष लक्ष द्यावे…
५) नवीन वर्षात आपणास वास्तूचे उर्वरित बांधकाम अथवा नवीन बांधकाम डेव्हलपमेंटला देणे ही कामे मार्गी लागणार आहेत..
६) मनासारखी वाहन खरेदी यावर्षी पार पडेल. मिथुन राशीने शक्यतो मेटॅलिक रंगाची वाहने वापरावीत..
७) महिला वर्गाची नवीन वाहन शिकण्याची इच्छा यंदा पुरी होणार आहे..
८) पाठीच्या दुखण्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये…
९) आर्थिक बाबतीत कुठलाही व्यवहार गृहीत न धरता त्याचे कागदपत्र पूर्ण करावेत. व्यवसायिकांना व्यवसायसाठी आवश्यक मोक्याची जागा यावर्षी मिळेल फक्त अशा जागेचे लॉन्ग टर्म एग्रीमेंट आठवणीने करून ठेवावे…
१०) यंदाच्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारच्या वादास कारणीभूत ठरवू नये…
टीप – वरील टिप्स या मिथुन राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. मिथुन राशीत असलेली पुनर्वसू, आद्रा, मृग या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84.
Horoscope Gemini Mithun ras 2023 New Year