India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्र्यंबकेश्वर व परिसरात दीप पूजन करुन दीप अमावस्या साजरी

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

त्र्यंबकेश्वर – आषाढ वद्य अमावस्या अर्थात दीप अमावस्या त्र्यंबकेश्वर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. दीप अमावस्या म्हणजे दिव्याची आवस. तिला आषाढ अमावस्या किंवा गतहारी अमावस्या (गटारी नव्हे) असेही म्हटले जाते. हिंदू संस्कृतीतील सर्व सण हे कृषीप्रधान निसर्ग महात्म्य सांगणारे आहेत. त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणे आहेत. त्यासाठीच ते साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दीप अमावस्या अर्थात गतहारी अमावस्या होय.

चातुर्मास हा संपूर्ण पावसाळाभर असतो. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे जड अन्नपदार्थ पचण्यास अवघड असतात. श्रावणा आधीचा आहार म्हणजेच जड आहार. म्हणजेच गतआहार. हा आहार या अमावस्येपासून बंद करून हलका आहार घ्यावा असा शास्त्रार्थ आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यापासून सुरु होणाऱ्या सर्वच सणवारात दीप प्रज्वलन महत्त्वाचे असते. त्यामुळे या दिवसाला दीप अमावस्या असे म्हटले जाते.

यानिमित्ताने ठिकठिकाणी घरातील सर्व ठेवणीतले दिवे, समई, निरांजन हे घासून पुसून स्वच्छ करण्यात आले. त्यासोबत कणिक दिवे बनवून पाटावर मांडण्यात आले. त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले. ठिकठिकाणी दिव्यांभोवती विविध रंगांची व फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. घरातील सदस्यांनी दिव्यांची मनोभावे पूजा केली. दिव्याची कहाणी ऐकून दिव्याची आरती करण्यात आली. या दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील चेतना आणि स्फूर्ती प्रज्वलित रहावी अशी कामना करण्यात आली. देवासह दिव्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.


Previous Post

ठाण्यातील मॉलमध्ये सुरू होते चक्क सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

Next Post

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; बघा, शहरातील संपूर्ण आरक्षणाची स्थिती

Next Post

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; बघा, शहरातील संपूर्ण आरक्षणाची स्थिती

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group