India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ठाण्यातील मॉलमध्ये सुरू होते चक्क सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

ठाणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – ठाणे शहरात सुमारे आठ ते दहा महिन्यापूर्वी एका मॉलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आले होते या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा चार महिन्यापूर्वी असाच प्रकार घडून आला. तेव्हा देखील काही मुलांना अटक करण्यात आली होती आता पुन्हा एकदा असहाय महिलांना फूस लावून त्यांच्याकडून कापूरबावडी येथील एका मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.

त्यांच्या तावडीतून चार पिडित महिलांचीही सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. ठाणे शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून असहाय महिलांना फूस लावून त्यांना शरीर विक्रयासाठी काही दलाल महिला पाठवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २७ जुलै २०२२ रोजी कापूरबावडी सर्कल येथील सिटी मॉल येथे बोगस ग्राहक पाठवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक भगवान औटी, जमादार श्रद्धा कदम आणि दिवाळे आदींच्या पथकाने सापळा लावून दोन कथित दलाल महिलांना अटक केली.

या छाप्यादरम्यान चार पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली. या दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपुर्वी मॉलमध्ये असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या स्पा सेंटरमध्ये एक डमी ग्राहक पाठवला. यावेळी डमी ग्राहकाला स्पामधील व्यक्तीने एका सेशनसाठी पाच हजार रुपये देण्यास सांगितले आणि डील फायनल झाली. त्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना कळवले आणि मग पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली.

विशेष म्हणजे ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असे. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अंती डील फायनल केली जात असे. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असे.

Thane Crime Mall Sex Racket Burst by Police Mumbai


Previous Post

अखेर केजरीवालांना सिंगापूर दौऱ्यास परवानगी नाहीच; ‘आप’ची मोदी सरकारवर टीका

Next Post

त्र्यंबकेश्वर व परिसरात दीप पूजन करुन दीप अमावस्या साजरी

Next Post

त्र्यंबकेश्वर व परिसरात दीप पूजन करुन दीप अमावस्या साजरी

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group