पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) मार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) शी संलग्न देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या कॅन्टोन्मेंट्स आणि मिलिटरी स्टेशन्समधील लष्कराच्या स्थानिक प्राधिकरणांद्वारे चालवल्या जाणार्या 136 आर्मी पब्लिक स्कूलमधील रिक्त अध्यापन पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
AWES ने जारी केलेल्या सूचनेनुसार, या शाळांमध्ये दि. 7 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी की, TGT, PGT आणि PRT भरतीसाठी रिक्त पदांची संख्या AWES ने जाहीर केलेली नाही.
सोसायटीने नोटीसमध्ये म्हटले आहे की, या वर्षी भरल्या जाणार्या सर्व पदांसाठीच्या रिक्त जागा संबंधितांनी जाहीर केल्या आहेत. या संदर्भात शाळा या मुलाखतीच्या व अध्यापन कौशल्य मूल्यमापनाच्या तारखेसह व्यवस्थापनाद्वारे घोषित केले जाईल. तथापि, AWES ने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की सर्व 136 आर्मी पब्लिक स्कूलमध्ये सुमारे 8700 शिक्षक पदे मंजूर आहेत. यामधून विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निर्माण होतात.
आर्मी पब्लिक स्कूल (APS) पहिल्या टप्प्यात TGT, PGT आणि PRT भरती 2022 साठी उमेदवारांच्या निवडीसाठी 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST) आयोजित करेल. OST मध्ये बसण्यासाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे 10 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केली जातील. यशस्वी उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखती व शिक्षण कौशल्यासाठी बोलावले जाईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना OST साठी नोंदणी करावी लागेल, जी AWES च्या अधिकृत वेबसाइट, awesindia.com वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकद्वारे किंवा खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे केली जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.