नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेसेज, फोटो, व्हीडिओच्या सोईस्कर आदान प्रदानासाठी व्हॉट्सअॅतप सोईस्कर माध्यम ठरले आहे. पण, व्हॉट्सअॅ पच्या अनेक युझर्सच्या अॅप वापरावर लवकरच मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हॉट्सअॅ्पने नवीन गोपनीयता धरणाला सहमती न देणाऱ्यांच्या वापरावर मर्यादा आणण्याची हमी 2021 मध्ये केंद्राला दिली होती. हे हमीपत्र सार्वजनिक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने पाच राष्ट्रीय वर्तमानपत्रांत हमीपत्र जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा आदेश ‘व्हॉट्सअॅ प’ला दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, ऋषिकेश रॉय व सी.टी. रविकुमार यांचाही या घटनापीठात समावेश आहे.
पुढील सुनावणीपूर्वीच अटींचे पालन आवश्यक
घटनापीठाने स्पष्ट केले, की आम्ही सरकारला दिलेल्या हमीपत्रात ‘व्हॉट्सअॅवप’ने घेतलेली भूमिका व सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत या पत्रातील अटी-शर्तीचे पालन केले जाईल, या ‘व्हॉट्सअॅेप’च्या वरिष्ठ वकिलांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत असल्याचे सांगत व्हॉट्सअॅ पने या संदर्भात आपल्या वापरकर्त्यांच्या माहितीसाठी पाच राष्ट्रीय वृत्तपत्रांत दोनदा या पैलूंची प्रसिद्धी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप
‘व्हॉट्स अॅलप’ व त्याची मातृकंपनी ‘फेसबुक’ यांच्या दरम्यान वापरकर्त्यांची संभाषणे, छायाचित्रे, संदेश, चित्रफिती आणि कागदपत्रांची अदानप्रदानाची मुभा देण्याच्या करारास आक्षेप घेणाऱ्या कर्मण्यसिंग सरीन आणि श्रेया सेठी या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यामुळे खासगी गोपनीयता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होते, असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे.
Supreme Court WhatsApp Use Limitations
Legal Hearing