India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकांचं नेहमीच दुसरा काय करतो याकडे लक्ष असतं. जिथे बॉलीवूडचा विषय येतो, तिथे तर हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं कलाकारांच्या खासगी आयुष्यात सगळेच दखल देत असतात. असाच काहीसा अनुभव बॉलीवूड कलाकारांना नेहमीच येतो. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये येणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींची नावे कायमच चर्चेत असतात. बॉलीवूड आणि पार्टी हे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. या पार्ट्यांवरून अनेकदा कलाकारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागल्याची उदाहरणे आहेत. याच पार्टीवरून सध्या अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा ट्रोल होत आहेत. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

पार्टी करून झिंगत बाहेर पडलेले हे दोघे नुकतेच मुंबईत एकत्र दिसले. आपले चेहरे झाकत दोघेही पार्टीतून बाहेर पडले. करीना कपूरची मैत्रीण अमृता अरोरा हिच्या वाढदिवसाची पार्टी होती. करिनाने आपल्या नवीन घरात या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, रितेश सिधवानी आदी लोकांनी पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र लक्ष वेधलं ते फरहान आणि अमृताचा कृतीमुळे, चेहरा लपवल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
दोघांचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एकाने लिहले आहे “असं काम करताच का, ज्यामुळे तोंड लपवयाची वेळ आली?” तर दुसऱ्याने अमृतावर निशाणा साधला आहे, त्याने लिहले की “अमृताचा फोटो कोण काढणार?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “दोघे बहुदा जास्त दारू प्यायले असावेत, नशेत असतील,” अशाप्रकारची टीका लोकांनी केली आहे.
अमृता अरोरा गेली अनेक वर्षे बॉलिवूडपासून दूर आहे. नुकतीच ती आपल्या बहिणीच्या ‘मूव्हिंग विथ मलायका’ या कार्यक्रमात येऊन गेली होती. तर फरहान अख्तर एका नव्या चित्रपटावर काम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Actor Farhan Akhtar Actress Amruta Arora Video Viral


Previous Post

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

Next Post

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

Next Post

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो... 'मी नव्या कलाकारांचा वापर करतो'

ताज्या बातम्या

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023

या राज्यात तांब्यासोबत आढळली सोन्याची खाण

March 22, 2023

पाडवा पटांगणावर शिवकालीन शस्त्रविद्या व भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group