India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिग्दर्शक अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधला प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याला त्याच्या वेगळ्या चित्रपटांबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनुरागला आतापर्यंत चार फिल्मफेअर पुस्र्कार मिळाले आहेत. जितका अनुराग प्रसिद्ध दिग्दर्शक आहे तेवढाच तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतो.

अनुराग सोशल मीडियावर सक्रीय असतो. कायमच बॉलीवूडविषयी भाष्य करतो. नुकतेच त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या नवीन कलाकारांबद्दल वक्तव्य केलं आहे. त्याचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव २.०’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट अनुराग कश्यपने दिले आहेत. आपल्या चित्रपटांमध्ये त्याने कायमच नवीन कलाकारांना संधी दिली आहे. याच कलाकारांबद्दल त्याने ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात भाष्य केलं आहे. कायम नवीन कलाकरांसोबत का काम करतोस, अशी विचारणा यावेळी त्याला करण्यात आली.

त्यावर अनुराग म्हणाला, “नव्या कलाकारांमध्ये भूक असते. चित्रपट तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्त प्रश्न विचारत नाहीत. जेव्हा कलाकार स्टार बनतो तेव्हा गोष्टी बदलतात, इतर लोकांचे चित्रपट तो करत असतो. स्टारडम मिळते. यामुळे त्याची शिकण्याची प्रक्रिया थांबते आणि चित्रपटाचे नुकसान होते. तो पुढे म्हणाला, “‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात मोठे स्टार नसते तर आम्ही चित्रपटाच्या ओपनिंगवर फोकस करू शकलो नसतो . चित्रपटाच्या ओपनिंगवर लक्ष दिले तर चित्रपटातला डीएनए निघून जातो. नव्या लोकांबरोबर काम करताना हे स्वातंत्र्य मिळते म्हणून मी नवीन लोकांबरोबर काम करतो. लोकांना असं वाटत की नव्या कलाकारांना संधी देतो मात्र तसे नाहीये. मी नव्या कलाकारांचा वापर करतो.” असे त्याने सांगितले.

अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच अभिनेता विकी कौशल यात ‘डिजे मोहब्बत’च्या भूमिकेत दिसणार आहे, त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Bollywood Director Anurag Kashyap on Casting Couch


Previous Post

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

Next Post

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

Next Post

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group