India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने मानवी आधारावर फाशीच्या शिक्षेच्या तरतुदींचा पुनर्वीचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचवेळी फाशीची शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे. गेल्यावर्षी देशातील अनेक न्यायालयांनी तब्बल १६५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या २० वर्षांतील एका वर्षात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) दिल्लीच्या गुन्हेगारी सुधारणा वकील गट प्रोजेक्ट ३९-ए जारी केलेल्या सातव्या ‘भारतात मृत्युदंड : वार्षिक सांख्यिकी अहवाला’मधून ही आकडेवारी समोर आली आहे.

५१ टक्के आरोपी बलात्कारी
मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी सर्वाधिक ५१.२ टक्के आरोपींना लैंगिक अत्याचारात दोषी ठरविण्यात आले आहे. म्हणजेच बलात्काराच्या घटनांना न्यायालयाने फारच गांभीर्याने घेतले आहे. लैंगिक अत्याचार कराल तर फासावर लटकाल, असाच संदेश त्यातून पुढे येत आहे.

एकाच प्रकरणात ३८ कैद्यांना दिलासा
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील एकाच प्रकरणामुळे ३८ कैद्यांना एकत्रितपणे फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने वर्षभरात सर्वाधिक कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. २००४ नंतर फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.

३९ प्रकरणांतील ५१ कैद्यांची शिक्षा कमी
सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांमधील फाशीच्या शिक्षेची प्रकरणे निकाली काढण्याबाबत अहवाल सांगतो की, गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने ११, तर उच्च न्यायालयांनी ६८ खटले निकाली काढले. उच्च न्यायालयांनी चार प्रकरणांमध्ये मृत्युदंड शिक्षा जाहीर केली. ३९ प्रकरणांमध्ये ५१ कैद्यांची शिक्षा कमी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयानेही दरोडा प्रकरणाच्या एका खटल्यात जन्मठेपेची शिक्षा फाशीत बदलली होती.

Rape Sexual Assault Court Sentence Last 20 Years


Previous Post

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

Next Post

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

Next Post

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

ताज्या बातम्या

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

March 22, 2023

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

ज्वेलरी शोरूम चोरट्यांनी फोडले; २६ लाखाचे अलंकार केले लंपास

March 22, 2023

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group