India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वीज दरवाढ बाबत हरकातींसाठी ग्राहकांना मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. आज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेऊ शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज दरवाढीबाबत महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेगुलेट्री अथॉरिटी ( MERC) कडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्याची सुनावणी होणार आहे आणि हरकती नोंदवणेसाठी सूचना केली आहे. सदर वीज दरवाढीचा एकूणच सर्व स्तरावरील विद्युत ग्राहकांना जबरदस्त फटका बसणार आहे. खालील सर्व विद्युत ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
१)मोठे औद्योगिक प्रकल्प
२)लघुउद्योग ग्राहक
३) घरगुती ग्राहक
४) पिठाची गिरणी आणि इतर दुकाने
५) हौसिंग सोसायटीज
(पाणी पंप, लिफ्ट इत्यादी)
६)शेतकरी वर्ग

वरील सर्व वीज ग्राहकांना वीजदरवाढ होईल आणि त्यामुळे महागाई देखील प्रचंड प्रमाणात वाढेल. शिवाय विविध उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातील. अशावेळी ग्राहकांनी गाफील राहून गप्प बसलेस नुकसान सर्वांचे होणार आहे. ग्राहक हा संघटित नाही त्याचा फायदा ही वीज वितरण कंपनी घेत आहे. वीज दरवाढ जरुरी नाही हे आपणास सदर ऑनलाईन सत्रात समजावून सांगितले जाईल शिवाय हरकती कशा घ्यायच्या याबाबत पण मार्गदर्शन लाभेल.

तेव्हा तमाम वीज ग्राहकांना आवाहन करणेत येते की उठा संघटित व्हा आणि आपला विरोध दर्शवा. आपल्याला MERC कडे याबाबत लेखी हरकत नोंदवायची आहे शिवाय आपण राज्याच्या वीजमंत्रीना पण आपले म्हणणे कळवायचे आहे. वीज दर वाढीने काय काय परिणाम होतील आणि आपण ती वाढू नये म्हणून कशी हरकत घ्यायची याबाबत हे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित केले आहे, असे पंचायतीचे विजय सागर यांनी कळविले आहे.

हे मान्यवर करणार मार्गदर्शन
१) श्री रवींद्र वैद्य, लघुउद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.
२) श्री प्रताप होगाडे, विद्युत ग्राहक संघटना
३) श्री विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
४) श्री अजय भोसरेकर, अध्यक्ष, कन्सुमर ग्रिवेन्स रीड्रेसल फोरम,(CGRF) पुणे आणि नाशिक (महाडीसकॉम). सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत.

हे लक्षात ठेवा
दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता
ऑनलाईन मार्गदर्शन
सर्वांना मोफत प्रवेश
कार्यक्रम team या प्लॅटफॉर्मवर लाभ घेता येईल
आपले नेहमीचे ब्राऊजर वरून त्यात जाऊ शकता किंवा आपण प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://teams.microsoft.com/l/meetup-join/19%3ameeting_ZmY5YjEyMjAtZjFjNC00MGIyLWJhMjAtMzZiNzY3N2FkYzRi%40thread.v2/0?context=%7b%22Tid%22%3a%22093c2d82-2b24-4e71-85bb-3ea871478cb9%22%2c%22Oid%22%3a%22ced29e67-96ee-4f24-b359-f1a5c85e3e9f%22%7d

Electricity Rate Hike Grahak Panchayat Guidance Program


Previous Post

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

Next Post

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली... कारखाली येऊन मृत्यू... आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार...

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group