India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामाहून परतलेल्या पित्याला 14 महिन्यांच्या चिमुकलीने पाहिले. आनंदाच्या भरात भेटण्यासाठी चिमुकली घराबाहेर पडली अन् तोच क्षण तिच्यासाठी अंतिम ठरला. आपल्या मुलीचा डोळ्यांदेखत मृत्यू पाहून पित्याचेही अवसान गळाले. अशी ह्रदद्रावक घटना नाशिक शहरात बुधवारी (दि. १) घडली.

अमजद अखतारखान खान (वय २८, रा. विराट नगर अंबड. मूळ उत्तरप्रदेश) हे पंधरा दिवसांपूर्वी नाशिक मध्ये त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी नातलगांच्या घरी आले होते. आर्थिक गणित जुळविण्यासाठी शहरातील एका खाजगी कंपनीत कामाला जात होते.
बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी आले असता त्यांच्या १४ महिन्यांच्या चिमुकली म्हणजेच आयेजा अमजद खान हिने त्यांना बघितले. वडिलांना बघितल्यानंतर ती आनंदाने धावून त्यांच्याकडे जाऊ लागली. याचवेळी काळाने तिच्यावर झडप घातली.
त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या हसनेन मुजम्मिल खान हे त्यांचे चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच.१५ एच. क्यू. ५६८६) घेऊन घराबाहेर निघाले. त्यांच्या गाडीची धडक रस्ता ओलांडून वडिलांकडे जाणाऱ्या आईजास बसली. काही कळण्याआधीच ती वाहनाच्या चाकाखाली गेली हा प्रसंग हसनेन खान यांच्या लक्षात न आल्याने ते वाहन घेऊन निघून गेले.

आयेजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघताच तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकाराबाबत वाहन चालक हसनेन खान यांच्या विरोधात वडील अमजद अखतारखान खान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वाहनचालक हसनेन खान याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस हवालदार रवींद्र पानसरे व दीपक शिंदे करत आहे.

Shocking Small Girl Death Father Car Crime


Previous Post

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

Next Post

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

Next Post

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार... नगर जिल्ह्यातील प्रकार...

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group