India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. आता जिल्ह्यातील शेती महामंडळाचा राखणदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. त्याने ५ हजाराची लाच मागितली होती. अखेर तडजोडी अंती त्याने ३ हजाराची लाच स्विकारली. आता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

एसीबीने दिलेल्या माहिती खालीलप्रमाणे
युनिट – अहमदनगर
तक्रारदार- पुरुष वय- ३३ वर्ष,रा.डिग्रस, ता- राहुरी, जि.अहमदनगर
आरोपी – नवनाथ अशोक थोरात, वय -३८ वर्ष पद-राखणदार, नैमित्यिक कामगार,महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, मर्यादित, टिळकनगर मळा, श्रीरामपूर ता- श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा- उक्कलगाव ता श्रीरामपूर
लाचेची मागणी- ५०००/-₹ ताडजोडी अंती-३,०००/₹
लाचेची मागणी – ता.०२/०२/२०२३
लाच स्विकारली – ३,०००/- ₹
लाच स्विकारली दिनांक – ०२/०२/२०२३

लाचेचे कारण -.तक्रारदार हे शेती व्यवसाय करत असुन, त्यांची उकलगाव ता श्रीरामपूर येथील गट न ३०२/०४ मधील १२ एकर वडिलोपार्जित जमीन त्यांचे पणजोबा यांनी शेती महामंडळ टिळकनगर यांच्या कडे खंडण्या साठी सन१९७० मध्ये दिली होती, त्या नंतर १९९७-९८ मध्ये मा महसूल आयुक्त नाशिक याच्या आदेशान्वये उक्कलगाव शिवारातील शेत गट न १६८ मध्ये ०४एकर क्षेत्र तक्रारदार यांचे पणजोबा यांचे नावे तक्रारदार यांच्या कुटुंबियांना कसण्यासाठी मिळाली आहे, सदर शेत जमीन च्या सात बारा उतारा वर वारसा प्रमाणे २००६ पर्यंत ची वारसा नोंद बरोबर लावण्यात आली होती ,सन २००६ मध्ये तक्रारदार यांच्या आई चे वारस म्हणून नाव ७/१२ उतारा वर नोंद लावण्यात आलेली होती, परंतु २००७ पासून ७/१२ उतारा वर आई चे नाव नसल्याचे तक्रारदार यांना २०१३ मध्ये लक्षात आले,त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आईचे नावे उप विभागीय अधिकारी,श्रीरामपूर यांचेकडे अपील अर्ज केला होता त्यावर २०२० पर्यंत कोणताही आदेश पारित झाला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा आई च्या नावे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे वारस हक्काप्रमाणे ७/१२ वर नाव नमूद करण्यासाठी डिसेंम्बर २०२२ मध्ये अर्ज केला आहे,
त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे,
सदर जमीन तक्रारदार स्वतः कसत आहेत,

दिनांक २९/०१/२०२३
रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांना फोन करून सांगितले की, सदर जमीन महाराष्ट्र शेती महामंडळाच्या नावे आहे ती तू कसु नको,
जर ती जमीन तुला कसायची असेल तर तू मला ५०००/-₹ दे, मी तुला सदर जमीन कसु देईल असे म्हणून लाच मागणी केली बाबत ची तक्रार तक्रारदार यांनी आज रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिली असता सदर तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी बेलापूर येथे पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ५,०००/- ₹ लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३०००/-₹ लाच मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. त्यावरून आज रोजी बेलापूर नाका प्राची फरसाण दुकाना जवळ लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष ₹ ३,०००/- लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
सापळा पथक – पोलीस नाईक रमेश चौधरी, अंमलदार,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,रविंद्र निमसे चालक हारून शेख,
मार्गदर्शक -मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
मा:- नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी –
स्थावर व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ,मर्यादित,
टिळकनगर मळा,श्रीरामपूर

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४

Ahmednagar District ACB Raid Bribe Corruption Trap


Previous Post

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group