वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पुष्पा- २ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे चित्रपटाच्या प्रत्येक बाबतीतील अपडेट निर्माते चाहत्यांना देत असतात. आताही निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-२ या चित्रपटामधील ‘पुष्पा पुष्पा’ या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे.
श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे. ‘पुष्पा: द राईज’ चित्रपटाचे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता ‘पुष्पा पुष्पा’ या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
“पुष्पा पुष्पा” हे पूर्ण गाणे १ मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत. पुष्पा -2 या चित्रपटाचं बजेट ५०० कोटींच्या आसपास पोहोचले आहे. या चित्रपटातील ६ मिनिटांच्या एका सीन साठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत, असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.