India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोठा दिलासा! अनेक गंभीर आजारांवरील औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटले; बघा, नवे दर

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्षयरोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यासह अनेक गंभीर आजारांचा तुम्ही सामना करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, या सर्व आजारांवरील औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तब्बल ४० टक्क्यांनी या औषधांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे दुर्धर आणि गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश असलेल्या ११९ औषधांचे कमाल दर निश्चित केल्याने या किमतींमध्ये लक्षणीय म्हणजे सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आता येत्या काळात आणखी काही औषधांचा समावेश हा एनएलईएम मध्ये करून त्यांच्या कमाल किमती निश्चित करण्याचा केंद्राचा विचार आहे. दरम्यान, ताप आल्यावर दिल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलचे दरही १२ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

केंद्र सरकारने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, आतापर्यंत दोन महिन्यात एकूण ३८४ औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने याविषयीच्या औषधांची यादीच जाहीर केली आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक औषध सूचीत या औषधांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे येत्या काही दिवसांत अनेक गंभीर आजारांवरील औषधी खूपच स्वस्तात मिळतील.

विशेष बाब म्हणजे यामध्ये पेटंट असलेल्या औषधांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे औषध उत्पादन कंपन्यांना महागड्या किंमतीत ही औषध विकता येणार नाहीत. केंद्र सरकारने याविषयीच्या सूचना आरोग्य मंत्रालयामार्फत संबंधितांना दिल्या आहेत. तसेच सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना या औषधांचा मोठा साठा करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना यातील काही औषध तर अल्प दरात मिळतीलच तर काही औषध मोफत मिळणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या यादीत ३४ अतिरिक्त औषधे जोडण्यात आली आहेत. तर २९ औषधे ज्यामध्ये रॅनिटिडाइन, अॅटेनोलॉल आणि मिथाइलडोपा ही काढून टाकण्यात आली आहेत. औषधांची किंमत, आवश्यकता आणि उपलब्धतेनुसार या यादीत जोडली जातात अथवा काढून टाकली जातात. या यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या औषधांमध्ये अनेस्थिसियाचं औषध, डोळ्यासंबंधीचं औषध, कॅन्सर, दुखणे, गाठी रोग, हृदयरोगावरील औषधांचा प्रामुख्याने समावेश आहे.

फॉर्म्युलेशनवाल्या औषधांची कमाल किंमत प्रति टॅबलेट आणि कॅप्सुलबाबत निश्चित करण्यात आली आहे. ज्या मुख्य औषधांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तापावरील औषध पॅरासिटामॉल आणि मलेरियामधील औषधांमध्ये उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन यांचा समावेश आहे.

औषधांचे सध्याचे आणि नवे दर असे
सोफिक्सिम…..२४.५ रुपये…… १९.७१ रुपये
पॅरासिटामोल…… २.०४ रुपये…… १.७८ रुपये
हायड्रोक्सिक्लोरोक्विन…… १३.२६ रुपये…… १२.३१ रुपये
टेमोझोलोमाइड…… ६६२.२४ रुपये…… ३९३.६ रुपये
एलोप्युरिनॉल…… ८.१ रुपये…… ५.०२ रुपये
लेट्रोझोल…… ३९.०३…… २६.१५ रुपये
क्लेरिथोरोमाइसिन…… ५४.८ रुपये…… ३४.६१ रुपये
फ्लुकोनाझोल…… ३४.६९ रुपये…… २६.५३ रुपये
मेटफोर्मिन…… ४ रुपये…… ३.११ रुपये.

Serious Disease Medicine Drug Rates Reduced
New Rate List


Previous Post

अवघ्या ५०० रुपयाची लाच घेताना सरकारवाडाचा पोलिस नाईक जाळ्यात; यासाठी मागितले होते पैसे

Next Post

मुंबई मोठे सेक्स रॅकेट उघडकीस; गुप्त खोल्यांमधील तब्बल २६ तरुणींची सुटका

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मुंबई मोठे सेक्स रॅकेट उघडकीस; गुप्त खोल्यांमधील तब्बल २६ तरुणींची सुटका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group