India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रणबीर-श्रद्धा कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; आतापर्यंत केली एवढी कमाई

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. या पदार्पणातच त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेला हा चित्रपट चालेल की नाही अशी परिस्थिती असताना, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. बाकी काहीही असले तरी ‘पठाण’ने सिनेसृष्टीला संजीवनी दिली आहे. कोरोनानंतर मरगळलेल्या चित्रपटसृष्टीतला तरतरी आली आहे. आता ‘पठाण’ प्रमाणेच आणखी एका चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगला गल्ला जमवला आहे.

होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. लव रंजन दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला रणबीर आणि श्रद्धा कपूर ही नवीन जोडी आली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रणबीर-श्रद्धाच्या या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या चित्रपटाने १५.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'Tu Jhoothi ​​Main Makkar' became the second biggest opener of 2023, earned 24 cr in 2 days
Congratulations to @ranbirrk @NEWSINSIDEMEDIA@ShraddhaKapoor@LuvFilms#TuJhoothiMainMakkar #RanbirKapoor #ShraddhaKapoor #TuJhoothiMainMakkarCollection #Bollywood pic.twitter.com/PpGjqrKy8N

— NEWS INSIDE (@NEWSINSIDEMEDIA) March 10, 2023

या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आहे. ‘पठाण’नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं. ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे.

रणबीर – श्रद्धा ही प्रेक्षकांसाठी फ्रेश जोडी आहे. आतापर्यंत हे दोघे कोणत्याच चित्रपटात एकत्र झळकलेले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील या जोडीबाबत उत्सुकता होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखी ताणून धरत या दोघांनी चित्रपटाचे प्रमोशनही वेगवेगळे केले.
८ मार्च रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. दिल्ली आणि गुजरातमध्ये या चित्रपटाची चांगली कमाई झाली. मात्र महाराष्ट्रात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये या चित्रपटाला आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तसेच धुळवडीमुळे उत्तर प्रदेशातही कमी कमाई झाली. कमाईचा हा आकडा दुसऱ्या दिवशी आणखी वाढू शकतो, असा अंदाज आहे. लव रंजनचे चित्रपट एकाच पठडीतील असले तरी प्रेक्षकांकडून त्यांना दमदार प्रतिसाद मिळतो.

Ranbir Shraddha Kapoor Movie Tu Jhooti Mai Makkar Collection


Previous Post

नाशिक जिल्ह्यातील शालेय परिपाठात होणार हा बदल

Next Post

ओला, उबेरने महाराष्ट्र सरकारकडे केला हा अर्ज; ग्राहकांना असा होणार थेट फायदा

Next Post

ओला, उबेरने महाराष्ट्र सरकारकडे केला हा अर्ज; ग्राहकांना असा होणार थेट फायदा

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group