India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यातील शालेय परिपाठात होणार हा बदल

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी व नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळा व महानगरपालिकेच्या शाळेत परिपाठ कालावधीत विद्यार्थ्यांना गोदावरी प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात यावा, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक तथा गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इगवे यांनी केले.

विभागीय माहिती कार्यालय, नाशिक येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, नाशिक आकाशवाणीचे प्रमुख शैलेश माळोदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स.द.मोहरे, जिल्हा परिषदेचे स्वच्छता तज्ज्ञ संदीप जाधव, विस्तार अधिकारी ( शिक्षण) मनीषा पिंगळकर, शिक्षण विस्तार अधिकारी (प्राथमिक) एस.एन.झोले, महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गिरीष निकम अशासकीय सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे उपस्थित होते.

श्री इगवे पुढे म्हणाले की, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी दर महिन्याला शाळांच्या प्रांगणात जलप्रदूषण रोखण्यासाठी पथनाट्य व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. परिवहन विभागाच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा करुन शहरातील रिक्षांवर गोदावरी प्रदूषण मुक्त संदर्भातील संदेशाचे प्रसारण करण्यात यावे. नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारीत होणाऱ्या ‘परिसर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला नद्या प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात यावे. साधू महंत, विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थाचा सहभाग घेवून जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात यावे, असेही श्री.इगवे यांनी सांगितले.

Nashik District School Paripath Change


Previous Post

कोतवालांचे मानधन आता एवढे झाले… बांधकाम परवानगीवेळी हे मिळणार…. जमिनीची नोंदणी इतक्या दिवसात पूर्ण होणार…

Next Post

रणबीर-श्रद्धा कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; आतापर्यंत केली एवढी कमाई

Next Post

रणबीर-श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; आतापर्यंत केली एवढी कमाई

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group