India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ओला, उबेरने महाराष्ट्र सरकारकडे केला हा अर्ज; ग्राहकांना असा होणार थेट फायदा

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी ओला आणि उबेर यांनी महाराष्ट्रात अॅग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केला आहे. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांत परवान्याबाबत निर्णय होणार आहे. राइड-हेलिंग सेवा पुरवठादार ओला आणि उबेर यांनी अॅग्रीगेटर परवान्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे अर्ज केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने आणलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे अॅप-आधारित कंपन्यांना परवाना घेणे बंधनकारक आहे.

सुप्रीम कोर्टाचे निर्देश
सध्या, या ऑपरेटर्सकडून उल्लंघन झाल्यास सरकार प्रभावीपणे कारवाई करू शकत नाही. परंतु परवाना दिल्याने परिस्थिती बदलू शकते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, राइड-हेलिंग सेवा कंपन्यांनी मुंबईच्या ताडदेव आरटीओमध्ये एग्रीगेटर परवान्यांसाठी अर्ज केले आहेत, असे संबंधित आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत काळसकर यांनी पीटीआयला सांगितले की, तीन-चार दिवसांपूर्वी ओला आणि उबेरकडून एकत्रित परवान्यांसाठी अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची छाननी केली जात आहे आणि नंतर परवाने देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ते मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (MMRTA) सादर केले जातील.

गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने अॅप-आधारित टॅक्सी एग्रीगेटर्सना 6 मार्चपर्यंत परवान्यांसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्रात त्यांचे कामकाज सुरू ठेवायचे असेल तर परवान्यासाठी अर्ज करा, असे न्यायालयाने म्हटले होते.
उबरच्या प्रवक्त्याने आरटीओला अर्ज सादर केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. उबरच्या प्रवक्त्याने सांगितले की, उबरने सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अंतिम मुदतीत चांगला अर्ज केला आहे. ओलाने अर्जासंदर्भातील प्रश्नांना उत्तर दिले नाही.

ग्राहकांना असा होईल फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सिटी टॅक्सी नियमानुसार परवाना मिळाल्यानंतर राज्य सरकार ओला, उबेरचे भाडे ठरवू शकणार आहे. यामुळे कंपन्यांची मनमानी होणार नाही. तसेच, मागणीनुसार भाडेही जास्त राहणार नाही. याशिवाय, खराब सेवा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारींसाठी एग्रीगेटर कंपनीला 24 तास हेल्पलाइन देखील द्यावी लागेल.

Ola Uber Taxi Service Application RTO Consumer Benefits


Previous Post

रणबीर-श्रद्धा कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; आतापर्यंत केली एवढी कमाई

Next Post

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी तुमच्या काही सूचना आहेत? तातडीने येथे पाठवा

Next Post

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी तुमच्या काही सूचना आहेत? तातडीने येथे पाठवा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group