India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काय सांगता! चक्क EMIवर मिळतोय हापूस; कुठे?

India Darpan by India Darpan
April 5, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळा आला की आंब्याचं मार्केट बहरून जातं. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी लोकांची धडपड असते. पण या साऱ्यात हापूस आंबा मात्र प्रत्येकाच्या नशिबी नसतो. कारण त्याचे दर परवडणारे नसतात. दोन आंबे घ्यायचे म्हटल्यावर घाम फुटतो. पण पुण्यातील एका व्यापाऱ्याने चक्क ईएमआयवर हापूस आंबा उपलब्ध करून देत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

गौरव सणस असे त्यांचे नाव असून त्यांनी हापूस आंब्याची पेटी ईएमआयवर विकायला सुरुवात केली आहे. ते बारा वर्षांपासून आंबा विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. पुण्यातील सनसिटी रोडवर आनंद नगर परिसरात त्यांचे चॉकलेट आणि फटाक्यांचे दुकान आहे. या वर्षापासून त्यांनी आपल्या दुकानात ईएमआयवर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. काही ग्राहकांनी त्याच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपयांचे आंबे खरेदी केले आहेत. त्यांना एका वर्षासाठी प्रत्येकी अडिच हजार रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा ईएमआयवर दिला जात असल्याने केवळ पुण्यातील नाही तर बाहेरच्या लोकांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी पेटीएमशीही करार केला आहे. सामान्य माणूस महागडे आंबे खरेदी करु शकत नाही, त्यामुळे ही कल्पना गौरव यांनी पुढे आणली आहे. तुम्ही आंबे खरेदी केल्यानंतर तुमच्या पूर्ण रकमेचे हप्ते पाडून तुम्ही तुमच्या आंब्याचे पेमेंट पूर्ण करू शकता. विशेष म्हणजे अगदी छोट्या रकमेचे देखील ईएमआय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जसे फ्लॅटचे, गाडीचे आणि मोबाईलचे ईएमआय पाडून घेता अगदी तसेच आता तुम्हाला आंबा देखील ईएमआयवर मिळणार आहे

मग आंबा का नाही?
लोक ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. मग आंबा ईएमआयवर खरेदी करायला काय हरकत आहे? ईएमआयमुळे गोष्टी सोप्या होतात. म्हणून माझ्या मनात कल्पना आली की ईएमआयवरही आंबा विकता येईल. जर एखाद्या व्यक्तीने पाच हजार रुपयांचा आंबा खरेदी केला तर त्याला आठ महिने किंवा बारा महिन्यांच्या ईएमआयवर पैसे भरण्याची सुविधा मिळेल, असे गौरव सणस म्हणतात.

Pune Fruit Alphonso Mango Sale on EMI


Previous Post

‘उद्धव ठाकरे अतिशय महाफडतूस माणूस’, नारायण राणेंचा हल्लाबोल

Next Post

म्हसरुळ भागात शॉर्टसर्किटमुळे आग…. उडाला एकच गोंधळ… चार घरांचे नुकसान (व्हिडिओ)

Next Post

म्हसरुळ भागात शॉर्टसर्किटमुळे आग.... उडाला एकच गोंधळ... चार घरांचे नुकसान (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group