India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘उद्धव ठाकरे अतिशय महाफडतूस माणूस’, नारायण राणेंचा हल्लाबोल

India Darpan by India Darpan
April 5, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मधु चव्हाण , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , सह मुख्य प्रवक्ते अजीत चव्हाण, राम कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले की , नेमके फडतूस कोण हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. कार्यतत्पर ,धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी ओळखच नसलेल्या कर्तृत्वशून्य उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही .२०१९ मध्ये भाजपाच्या आधारावर ज्यांचे आमदार निवडून आले त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिट्ठी दिली. मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिले , देशद्रोही शक्तींशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना पाठीशी घातले , असेही श्री . राणे म्हणाले.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री माननीय नारायणरावजी राणे यांची पत्रकार परिषद https://t.co/vxQed1HXH3

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 5, 2023

BJP Minister Narayan Rane on Uddhav Thackeray Allegation Politics


Previous Post

२५५ कृउबा समिती निवडणूक… ४५९० जागा… तब्बल ३२५५९ अर्ज दाखल….

Next Post

काय सांगता! चक्क EMIवर मिळतोय हापूस; कुठे?

Next Post
प्रातिनिधिक फोटो

काय सांगता! चक्क EMIवर मिळतोय हापूस; कुठे?

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group