India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तब्ब्येत बिघडली; राहुल गांधी म्हणाले…

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची तब्ब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत रूग्णालयात आहे. पंतप्रधान मोदी देखील रूग्णालयात पोहोचले आहेत.

श्वसनाच्या त्रासामुळे हिराबेन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा डॉक्टारांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. हिराबेन यांनी गेल्या १८ जून रोजी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती.

हिराबेन यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रार्थना केली आहे की, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी. अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या होतील.”

एक मां और बेटे के बीच का प्यार अनन्त और अनमोल होता है।

मोदी जी, इस कठिन समय में मेरा प्यार और समर्थन आपके साथ है। मैं आशा करता हूं आपकी माताजी जल्द से जल्द स्वस्थ हो जाएं।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2022

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यानी देखील ट्विट केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंची तब्येत खालावल्याची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत. मोदीजी यांच्या आईंची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की माता जी के अस्वस्थ होने का समाचार प्राप्त हुआ। इस घड़ी में हम सब उनके साथ हैं।

मैं ईश्वर से प्रार्थना करती हूं कि उन्हें जल्द स्वास्थ्य लाभ मिले।

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 28, 2022

PM Narendra Modi Mother Admitted in Hospital
Gujrat Health Hiraben


Previous Post

गुलमोहराच्या झाडातून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी; खरे काय आहे? (बघा व्हिडिओ)

Next Post

पर्यावरणासाठी झोकून देणारे थोडेथोडके नाही तर तब्बल एवढे जण आहेत; बघा, कोण कोण आहे त्यात?

Next Post

पर्यावरणासाठी झोकून देणारे थोडेथोडके नाही तर तब्बल एवढे जण आहेत; बघा, कोण कोण आहे त्यात?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group