India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुलमोहराच्या झाडातून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी; खरे काय आहे? (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in संमिश्र वार्ता
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-वणी रस्त्यावर असलेल्या ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडातून अचानक झर्‍यासारखे पाणी येऊ लागले आहे. ही वार्ता परिसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईल मध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजून बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. मात्र, हे खरे आहे की खोटे याबाबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माहिती दिली आहे.

गुलमोहराच्या झाडातून पाणी येत असल्याचा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. ते पाहून दूरवरुन अनेक जण तेथे येत आहेत. कुणीही या मागचे कारण न जाणून घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परिसरात या निमित्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डाॅ.टी.आर.गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

म्हणून येत होते पाणी
यासंदर्भात चांदगुडे यांनी सांगितले की, “सदर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईन मध्ये शिरली. झाड जीर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मुळे, खोड यातून पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते. याचा अर्थ हा चमत्कार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये”

नाशिक मध्ये गुलमोहोराच्या झाडातून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी
खरे आहे की अफवा?
अनिसने दिले हे कारण pic.twitter.com/zGxNkqvTtv

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) December 28, 2022

Gulmohar Tree Water Viral Video Peoples Crowd
Superstition Science


Previous Post

निफाड तालुक्यातील जवान जनार्दन ढोमसे यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण; उगाव गावावर शोककळा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तब्ब्येत बिघडली; राहुल गांधी म्हणाले…

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तब्ब्येत बिघडली; राहुल गांधी म्हणाले...

ताज्या बातम्या

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group