बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पर्यावरणासाठी झोकून देणारे थोडेथोडके नाही तर तब्बल एवढे जण आहेत; बघा, कोण कोण आहे त्यात?

by Gautam Sancheti
डिसेंबर 28, 2022 | 9:43 pm
in इतर
0
tree

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री – 
मागे वळून पाहताना

मागील वर्षी याच दिवसात निसर्गयात्री हे सदर लिहिण्याचं ठरवलं. निसर्गातला साधेपणा, निस्वार्थी वृत्ती, त्याची निर्मळता, स्वच्छंदीपणा आणि निसर्गाचं गूढ अस्तित्व कायमच आकर्षित करत असल्यामुळे हे सदर लिहावं असं मनापासून वाटलं. यापूर्वी खरंतर निसर्ग किंवा पर्यावरण या विषयावरचा कोणताही अभ्यासक्रम अभ्यासलेला नव्हता. त्या संदर्भातलं फारसं वाचन केलं नव्हतं किंवा मी काही त्या विषयातील तज्ञ देखील नाही परंतु, जसजसं या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करत गेले, वाचन करत गेले तसतसा निसर्ग आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांच्याबद्दलचा आदर दुणावत गेला.

Smita Saindankar
स्मिता अनिल सैंदानकर
मो. 9423932203

मी ‘निसर्गयात्री’ या मालिकेत अनेक देशी विदेशी निसर्गयात्रींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. या लिखाणाच्या प्रवासात वर्षभरात सतत हे जाणवत गेलं की, निसर्ग संवर्धनाचं वेड असलेली ही माणसं खरंच अद्भुत आहेत. समाजाशी, निसर्गाशी त्यांची असलेली बांधिलकी एखाद्या संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व करतं.अनेक महिला निसर्ग संवर्धनाच्या या कार्यात जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवतात पण प्रत्यक्ष ते करत असताना त्यांना सर्व पातळ्यांवर किती संघर्ष करावा लागत असेल. त्यांच्या आयुष्यात किती वादळं उठत असतील हे कदाचित त्यांनाच माहीत असेल. त्यामुळेच वसुंधरेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेलं योगदान खरोखर अभिनंदनीय आहे. मग त्यात अगाध वृक्षज्ञान असणाऱ्या 78 वर्षाच्या अनवाणी इकॉलॉजिस्ट पद्मश्री तुलसी गौडा, ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे, ‘ सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाद्वारे पर्यावरण विश्वात खळबळ माजवून देणाऱ्या पर्यावरण चळवळीच्या जनक राशेल कार्सन, ‘नदी वाचवा’ असं कळकळीने आवाहन करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या जलतज्ञ परिणीता दांडेकर होत्या. तर कधी अत्यंत साहसी अशा स्त्री वन्यजीव छायाचित्रकार निशा पुरुषोत्तम, पर्यावरण पत्रकारितेमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या लढवय्या बहार दत्त, आधुनिक तरुण शेतकरी भगिनी अपूर्वा आणि आदिती संचेती , केनिया सारख्या मागास आफ्रिकन देशातल्या ग्रीन बेल्ट चळवळीच्या प्रणेत्या वंगारी माथाई, नागालँड सारख्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या अकाईना गोंमेई त्यांच्या अद्वितीय कार्याने अचंबित करतात.

भारतीय संस्कृतीच्या प्रेमात परदेशी जीवनशैली सोडून निसर्गस्नेही जीवनशैली अंगी करणाऱ्या काता आणि ब्लॉका या मैत्रिणी , रेडिओ सारख्या माध्यमाद्वारे निसर्गसंवर्धनाचे कार्य करणारी रेडिओ बुंदेलखंडचा खणखणीत आवाज वर्षा राईकवार, सारस पक्ष्यांची तारणहार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ डॉ. अमृता देवी बरमन, बालवयात ‘बाय बाय प्लास्टिक बॅग’ चळवळ उभारणारी इंडोनेशियाचा छोटा पॅकेट बडा धमाका मेलाती विजसेन, झारखंडच्या जंगलांमध्ये तस्करांशी लढणारी लेडी टारझन जमुना तुडू, फॅशनसारख्या सर्जनशील क्षेत्रात पर्यावरणस्नेही कपड्यांचा ट्रेंड आणणारी रिबेका अरली, सोमालियासारख्या पुरुषसत्ताक देशामध्ये स्त्रीकल्याणासोबत निसर्गसंवर्धनाला प्राधान्य देणारी फातिमा जिब्रेल या सर्व स्त्रिया वेगवेगळ्या मार्गाद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग संवर्धन कसं करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण जगापुढे ठेवतात. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ या वचनानुसार स्त्रीने जर ठरवलं तर ती तिच्यासोबत एक कुटुंबही घडवत असते आणि पर्यायाने समाज. त्यामुळे स्त्रियांचं या क्षेत्रातले योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे.

यासोबतच या लिखाणाच्या प्रवासात बहुमताहून वेगळे असे सामान्यातले असामान्य पती-पत्नी म्हणजे श्री. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचा जीवन प्रवास तसंच कलाहारीतलं मार्क आणि डेलिया ओव्हेन्स यांचा आगळं वेगळं सहजीवन आश्चर्यचकित करून जातं. या विषयाचा पाठपुरावा करताना, अभ्यास करताना अनेक ध्यासवेडी मंडळी समोर येत गेली. जसे गिधाडांचं वल्चर रेस्टॉरंट चालवणारे प्रेमसागर मिस्त्री, आधुनिक भारताचे भगीरथ राजेंद्र सिंह, विसलमॅन चंद्रकिशोर पाटील, तरुण धडाडीचा जंगल कायदे तज्ञ किरण रहाळकर, कासवांसारख्या अत्यंत दुर्लक्षित अशा प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारे भाऊ काटदरे, रानवेडातून संशोधनापर्यंत मजल गाठणारे डॉ. कृष्णमेघ कुंटे, आइस मॅन ऑफ इंडिया चेवांग नोरफेल, वसुंधरा दिनाचे जनक गेरॉल्ड नेल्सन, सोलार एनर्जीचा प्रसारक अमोघ सहजे, निसर्गातला संगीतयात्री अभिषेक रे, निसर्गातील समस्यांना फिल्म माध्यमाद्वारे प्रकाशात आणणारे माइक पांडे, गडकिल्ल्यांचे महितीतज्ञ दुर्गभ्रमंतीकार प्र. के. घाणेकर, ट्री मॅन ऑफ इंडिया एम. योगनाथन, ‘माती वाचवा’ संदेश देणारा मातीतला माणूस डॉ. रतनलाल, डॉटर वॉटर आणि ट्री हा नारा देणारे शामसुंदर पालीवाल, ई-कचऱ्यातून कला सादर करणारे शिल्पकार हरिबाबू नातेसन, जंगल डायरी म्हणून प्रसिद्ध असणारे अतुल धामणकर, बिहारचा जल योद्धा एकलव्य प्रसाद, पाणी बाबा म्हणून ओळखले जाणारे पाणी पंचायतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया जादव पायेंग, अमेरिकेतील अभयारण्यांचा जनक जॉन म्युर अशा अनेक हस्ती, त्यांचं कार्य समोर येत गेलं. यामध्ये चित्रपट क्षेत्रातले सुप्रसिद्ध कलाकारही मागे नव्हते.

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराईचा उल्लेख होणंही गरजेचं आहे. निसर्गसाहित्याद्वारे निसर्गाची प्रत्यक्ष अनुभूती देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली तसंच वालडनचा निसर्गरम्य अनुभव देणारा थोरो यांची ओळख दिल्याशिवाय या मालिकेला पूर्णता येणं शक्य नव्हतं. या मालिकेमध्ये एकच देरसू उजाला नावाचं काल्पनिक पात्र घालण्याचा प्रयत्न केला गेला. मानवाच्या निसर्गयात्रेमध्ये वाटाड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असतं. अशा वेळेला देरसू सारखे अनेक ज्ञातअज्ञात लोक आपल्याला निसर्गाची अनुभूती देत असतात. वेळोवेळी आपले रक्षण करत असतात.येणाऱ्या संकटांपासून वाचवत असतात. त्यामुळे या वाटाड्यांचं प्रतिनिधित्व करणारा देरसु उजाला सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांना आदराचे स्थान आहे. सूर्य, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांच्या अस्तित्वावरच हे जग आणि अखंड जीवसृष्टी शाबूत आहे हे मानवाला मान्य आहे. मानवाने प्रचंड प्रगती केली. जसजसे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन शोध लागू लागले, तसतसे मानवाला स्वतःच्या बुद्धीवर गर्व होऊ लागला आणि तो निसर्गावर विजय मिळवून पाहू लागला पण निसर्ग वेळ आल्यावर त्याचं अस्तित्व दाखवून देतो. मानव कितीही वरचढ झाला तरी निसर्गापुढे खुजा आहे हे दाखवून देतो. जगभरात असंख्य धर्म, जातीपाती मानल्या गेल्या. प्रत्येक धर्माने आपापली अशी दैवी शक्ती मान्य केली की जिथे ते नतमस्तक होऊ शकतील. कृतज्ञता व्यक्त करू शकतील. परंतु कालांतराने ह्याच शक्ती मानवातील आपसातील वितुष्टाला कारणीभूत झाल्या. अहंकाराचा मुद्दा बनल्या. परंतु अखिल मानव जातीने जर या पंचमहाभूतांचं अस्तित्व, महत्त्व मान्य केलं आणि केवळ त्यांच्या अस्तित्वालाच दैव स्वरूप मानून निसर्गाची होणारी हानी थांबवली तरच अखिल जीवसृष्टी वाचू शकते. म्हणजेच स्वार्थ आणि परमार्थ हा दोन्ही साधायचा असेल तर आता निसर्गाचा आदर राखून निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारून, निसर्ग संवर्धन हेच आपलं आद्य कर्तव्य मानून मानवाने पुढची पावलं उचलायला हवी. सुबत्तेकडून ….समाधानाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

या लिखाणाचा संपूर्ण प्रवास खूप माहिती पूर्ण जरी असला तरी ज्ञानात भर घालणारा ठरला, अनुभव समृद्ध आणि ज्ञानसंपन्न करणारा ठरला. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ नेणारा झाला. त्यामुळे निसर्गयात्रा लेखमालेच्या निमित्ताने निसर्गातल्या अनेक ज्ञात अज्ञात पैलूंचा उलगडा होत गेला. खरंतर अशी बरीच असामान्य व्यक्तिमत्व ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीनुसार ,विविध मार्गांनी या क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने आपलं निसर्गाप्रती योगदान देत असतात. या सर्व निसर्गयात्रींच्या अतुलनीय कार्याला आमचा सलाम.
धन्यवाद
स्मिता अनिल सैंदानकर
9423932203

Column Nisargayatri Environmentalist by Smita Saindankar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तब्ब्येत बिघडली; राहुल गांधी म्हणाले…

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - संता आणि बंता

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011