येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालूक्यातील पारेगाव येथिल एका शेतक-याने त्याच्या कांद्याच्या शेतात अनोख्या गुढी उभारल्या आहे. गुढीला कांद्याची, द्राक्षांची, कारले, मिरच्या यांच्या माळा घालत या गुढ्या उभारत त्यावर कांद्याला हमीभाव द्या, पावसाने पीक झाली उदध्वस्त, शेतमालाला हमी भाव द्या असे फलक त्या गुढीला लावत शेतक-यांच्या व्यथा दर्शवित सरकारचे लक्ष गुढीच्या माध्यमातून वेधण्याचा प्रयत्न केला. मराठी नव वर्षाचा गुढीपाडवा हा सण आज सर्वत्र मोठ्या उत्सहात विविध उपक्रमांनी साजरा होत असतांना या गुढीची मात्र सर्वत्र चर्चा आहे.
Nashik Yeola Farmer Gudhi Onion Grapes Demand