India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात भरणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृह प्रदर्शन; अनेकांचे गृहस्वप्न होणार साकार

India Darpan by India Darpan
November 12, 2022
in वाणिज्य
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे सोबतच प्रगतीशील नाशिक मध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे गृह प्रदर्शन क्रेडाई शेल्टर चे आयोजन गंगापूर रोड वरील डोंगरे वस्ती गृह मैदा येथे 24 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होत आहे .’ विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संक्ल्पेनेवर आधारित या प्रदर्शनात 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असतील. हे ५ दिवसीय प्रदर्शन खऱ्या अर्थाने राज्यातील सर्वात भव्य गृह प्रदर्शन असून या प्रदर्शनास सुमारे १ लाखाहून अधिक दर्शक भेट देतील असा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला .

शेल्टर मुळे ग्राहकांना नाशिक तसेच सिन्नर, दिंडोरी, धुळे, जळगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी सुरू असलेले अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळेल, ज्यात बजेट प्रॉपर्टी ते परवडणारी घरे ते अगदी पॉश अपस्केल डायनॅमिक लक्झरी प्रकल्प आहेत. या सोबत प्लॉट , फार्म हाउस , व्यवसायिक , शोप्स याचे देखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत ..या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल, टाइलिंग, प्लंबिंग, कंत्राटदार, खिडक्या, काच, , सोलर, बांधकाम साहित्य ,लिफ्ट, सिक्युरीटी सिस्टम याची देखील प्रदर्शनात माहिती मिळेल

रवी महाजन पुढे म्हणाले की सद्यस्थितीत हवामान , उद्योग आणि शिक्षण सुविधा यामुळे नाशिक हे हॉट फेवरेट डेस्टिनेशन आहे. तसेच येऊ घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे नाशिक मध्ये आज रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात नक्की फायदे का सौदा ठरणार आहे. निर्माणाधीन चेन्नई-सुरत एक्स्प्रेस वे नाशिकला दक्षिणेशी जोडण्यासाठी आणि गुजरातच्या इको-हब असलेल्या सुरतशी नाशिकची जवळीक निर्माण करण्यासाठी एक प्रवेशद्वार असेल तसेच 3500 कोटींचा रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प, इंडिअन ओईल प्रकल्प, अनेक नवे हॉस्पिटल्स , शैक्षणिक संस्था या मुळे देखील रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी शहरात उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले

प्रदर्शनाच्या विशेषता बाबत अधिक माहिती देतांना शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, म्हणाले की हे प्रदर्शन अनेक अंगाने महारष्ट्रातील सर्वात भव्य प्रोपर्टी प्रदर्शन आहे . शेल्टर 1.5 लाख+ चौरस फूट पॅव्हेलियन एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरले असून हे पूर्णपणे पेपरलेस आहे. एक्स्पोमध्ये स्वतंत्र बिझनेस लाउंज आणि समर्पित नेटवर्किंग पॉड्स देखील असतील जिथे ग्राहक प्रदर्शकांशी संवाद साधू शकतात. याव्यतिरिक्त, विशेष ऑफर, लकी ड्रॉ आणि जिंकण्यासाठी आकर्षक स्पॉट बक्षिसे देखील असतील. त्याच शिवाय हैप्पी स्ट्रीट चे आयोजन देखील प्रदर्शन स्थळी करण्यात येईल २२ नोव्हेंबर पर्यंत ओंनलाईन नोंदणी करणाऱ्यास प्रदर्शनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क लागणार नसून शिवाय अनेक आकर्षक स्कीम आणि ऑफर देखील येथे देण्यात येत आहेत. क्रेडाई नाशिक मेट्रोनेही सोय लक्षात घेऊन नाशिकच्या महत्त्वाच्या ठिकाणांहून वाहतूक व्यवस्था केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोविड नंतर, मोठ्या घरांची मागणी वाढली असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. अश्या वेळेस एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध झाल्याने हे प्रदर्शन निशितच यशस्वी होईल असेही कृणाल पाटील यांनी नमूद केले .

दृष्टीक्षेपात शेल्टर २०२२
१. एक्स्पोमध्ये 100 बिल्डर चे ५०० हून अधिक प्रकल्प
२. बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्थाचा सहभाग
३. जागतिक दर्जाच्या सुविधा
४. नाशिक मधील सर्वप्रथम लेगसी वाल
५. २१ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी केल्यास प्रवेश मोफत
६. प्रदर्शनास भेट देणार्यामधून दहा लकी ड्रो विजेता आणि एक बम्पर बक्षिस
७. लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि फन झोन
८. रोज हैप्पी स्ट्रीट मध्ये स्थानिक कलाकारंसह संगीत आणि फन फेअर


Previous Post

‘येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला जबर फटका बसणार’, आमदार सुहास कांदेंचाच दावा

Next Post

असा पडला ढकांबे येथे धाडसी दरोडा… २८ तोळे सोने लंपास.. पोलिसांच्या तपासात उघड झाल्या या धक्कादायक बाबी

Next Post

असा पडला ढकांबे येथे धाडसी दरोडा... २८ तोळे सोने लंपास.. पोलिसांच्या तपासात उघड झाल्या या धक्कादायक बाबी

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group