दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील ढकांबे येथील रतन शिवाजी बोडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून 28 तोळे सोने व साडे आठ लाख रुपये रोख रक्कम असे एकुण 17 लाख 34 हजारांचा ऐवजांचा धाडसी दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ढकांबे येथे आशेवाडीला जाणार्या रस्त्यालगत मानोरी शिवारात गट नंबर 40/3 मध्ये रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीची शिवकमल नावाची दोन मजली बंगला आहे. रात्री दिड ते तीन वाजेच्या सुमारास 35 ते 40 वयोगटातील 6 सहा दरोडोखरांनी बंगल्याच्या खालच्या मजल्यावरील किचनच्या दरवाजावाटे बंगल्यात प्रवेश केला. हातात बंदुक व प्राणघातक हत्तार्यांच्या सहाय्याने धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दरोडेखोरांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना एका बेडरूम मध्ये कोंडत लूट केली. यावेळी 28 तोळे सोने, साडे आठ लाख रुपये रोख रक्कम असे एकुण 17 लाख 34 हजार 400 रुपयाचा इतका ऐवज घेवून रतन बोडके यांच्या मालकीच्या क्रेटा कार (क्र. एमएच 15 एचवाय 3053) मध्ये बसून दरोडेखोर फरार झाले.
सदर कार ढकांबे फाट्यावरील वाडा हॉटेलजवळ बेवारस लावून दरोडेखोर फरार झाल्याचे आढळून आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, नाशिक उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करुन दरोडोखोरांचा मार्ग बघण्यात आला.
अज्ञात दरोखारांवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पांडूरंग कावळे, अजय कवटे, हवालदार प्रमोद मुंढे, सुदाम धुमाळ, धनंजय शिलवटे, बाळासाहेब पजई आदी दिंडोरी पोलिस करीत आहे.
कार येथे सापडली
चोरट्यांनी बोडके यांचे घरात लूट करत त्यांचेच कार मधून पलायन केले मात्र जवळच नाशिक कळवण रस्त्यावर वाडा हॉटेल जवळ गाडी बेवारस सोडत चोरटे फरार झाले.बंगल्यात सीसीटिव्ही होते मात्र त्याची हार्ड डिस्क ही चोरटे घेवून गेल्याचे समजते.
पोलिसांना घटनेची माहिती समजताच पहाटे चार पासून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासला सुरवात केली.श्वान पथक ठसे तज्ञ यांना पाचारण करत तपास पथक तयार करत तपास सुरू आहे.
Dindori Dhakambe Dacoity Police Investigation
Crime Nashik