नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नानावली भागात जुन्या वादाची कुरापत काढून एकाने दोघा मित्रांवर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहे. या मारहाण प्रकरणी किशोर बाबुराव वाकोडे (२१ रा.भगवतीनगर,कथडा) या युवकाने तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इल्या उर्फ विनोद चौधरी (रा.भगवतीनगर) असे मित्रांवर प्राणघातक हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. वाकोडे व डुब-या उर्फ ऋषभ दिनेश लोखंडे हे दोघे मित्र गेल्या सोमवारी (दि.७) रात्री नानावलीतील शेलार कॉलनी भागातील फेमस बेकरी परिसरात मद्यपान करीत असतांना ही घटना घडली. वर्पे गॅरेज समोरील मोकळया जागेत दोघे मित्र दारू पित असतांना संशयित तेथे आला. त्यानेही दोघा मित्रांबरोबर मद्यपान केले. यावेळी संशयिताने जुन्या वादाची कुरापत काढून दोघा मित्रांवर चॉपरने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत दोघे मित्र गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असून वाकोडे यांनी दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.