नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३० हजाराच्या ऐवज लंपास केले. ही घरफोडी डीजीपीनगर नं.२ मध्ये घडली. त्यात ९ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. या घरफोडी प्रकरणी अतुल अरूण उंबरकर (रा.लोटस हाईटस,वृंदावननगर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरकर कुटुंबिय मंगळवारी (दि.८) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातील ९ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.