शिकवणीहून घराकडे जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिकवणीहून घराकडे जाणा-या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग करीत चावा घेतल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलानगर भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि.२) शिकवणीसाठी घराबाहेर पडली होती. शिकवणी आटोपून ती सायकलवर घराकडे जात असतांना ही घटना घडली. सायंकाळच्या वेळी ती गल्ली नं ४ मधून सायकलवरून प्रवास करीत असतांना सतरा वर्षीय मुलाने तिची वाट अडविली. यावेळी संशयिताने मुलीचा विनयभंग करीत तिच्या मानेस चावा घेतला. या घटनेत मुलगी जखमी झाली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विधी संवर्धीत बालकास ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.
मार्केट यार्डात परिचीताने कामगार महिलेच्या कानाचा लचका तोडला,
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात परिचीताने कामगार महिलेच्या कानाचा लचका तोडल्याची घटना घडली. मार्केट यार्डात काम करणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हमाली काम करणारी पीडिता गुरूवारी (दि.३) मार्केट यार्डात काम करीत होती. बाथरूमला जात असतांना पिंटू गौतम या परिचीताने तिची वाट अडविली. यावेळी संशयिताने तू माझ्या सोबत चल असा आग्रह धरला मात्र महिलेने नकार देताच त्याने तिचा विनयभंग केला. महिलेने झटापटीत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिच्या गालास चावा घेवून कानाचा लचका तोडला. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.