नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतनगर भागात राहणा-या पंधरा वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच भागात राहणा-या तरूणाने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. या प्रेमप्रकरणात संशयिताने मुलीस जुलै २०१७ ते आजपर्यत शहरातील वेगवेगळया भागात घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. याकाळत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाप प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.