नाशिक : नांदूर – मानूर मार्गावर भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या मालट्रकवर आदळल्याने १८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. मोहम्मद अली गुलाम मोहम्मद खान (रा.चारी नं.६ मानूर,दसक नाका माडसांगवी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खान सोमवारी रात्री नांदूरनाक्याकडून आपल्या घरी दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला होता. नांदूर मानूर मार्गावरील वेताळबाबा मंदिरासमोर हा अपघात झाला. भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने खान गंभीर जखमी झाला होता. खान यांच्या कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार एस.आर.गांगुर्डे करीत आहेत.