नाशिक : हिरावाडी भागात राहणा-या ३६ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सोनाली सचिन भावसार (रा.साई अक्षदा अपा.शिवकृपानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. भावसार यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाली भावसार यांनी मंगळवारी (दि.२६) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ पंचवटीतील ग्रॅव्हिटी हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.मिराज खान यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.