India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चोरट्यांची हिम्मत बघा, कारमध्ये बसलेल्या महिलेचे चेनस्नॅचिंग… नाशकात असा घडला सर्व प्रकार

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीकडून भूजबळ नॉलेज सिटीकडे जाणा-या मार्गावर कारमधून प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र व राणीहार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना संतोष शिंदे (३० रा.जाखोरी ता.सिन्नर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंदे दांम्पत्य शुक्रवारी (दि.१७) शहरात आले होते.

दुपारच्या सुमारास दांम्पत्य परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली. हिरावाडीकडून भूजबळ नॉलेज सिटी कॉलेजकडे जाणा-या मार्गाने पती -पत्नी कारमधून प्रवास करीत होते.

पाटालगतच्या वाघाडी नदी पुल परिसरात शिंदे या पाठीमागील सिटावर खिडकीची काच उघडी करून बसलेल्या असतांना कमलनगर बाजूकडून पल्सरवर आलेल्या हेल्मेटधारी दोघांपैकी एकाने धावत्या कारच्या खिडकीत हात घालून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि राणीहार असा सुमारे १ लाख ८८ हजाराचा ऐवज हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.


Previous Post

लग्नास नकार देत तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले; सिडकोतील तरुणाला अटक

Next Post

मिशन इयत्ता दहावी –  अवघड प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर गुण कसे मिळवावेत? (व्हिडिओ)

Next Post

मिशन इयत्ता दहावी -  अवघड प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर गुण कसे मिळवावेत? (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group