India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत तब्बल एवढे खटले; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. तसेच, न्यायालयीन खटल्यांची सुनावणी आणि निकाल यात मोठा कालावधी लागत असल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र, देशभरातील न्यायालयांमध्ये किती खटले प्रलंबित आहेत हे तुम्ही जाणून घ्याल तर नक्कीच थक्क व्हाल.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची १८ वी बैठक राजस्थानामधील जयपूर येथे नुकतीच पार पडली. कायदा, न्यायालयीन कामकाज आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशात ५ कोटी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. रिजिजू आणि सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात देशभरातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाच्या मुद्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशभरात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे कारण स्पष्ट केले. रमणा म्हणाले, “न्यायालयीन भरती न केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत.

जर वेळेत योग्य भरती झाली असती तर प्रकरणे निकाली लागण्यासाठी गती मिळाली असती आणि ५ कोटी प्रकरणे प्रलंबितही राहिली नसती.“ यावेळी त्यांनी लवकरात लवकर न्यायालयीन भरती घेण्याची मागणी सरकारी व्यवस्थेकडे केली. प्रलंबित असलेल्या प्रकरणाला उत्तर देण्याची जबाबदारी ही कायदा मंत्र्यांची असल्याचेही रमणा यांनी सांगितले. अनावश्यक अटक व जामीन मिळवण्यातील अडचणींवरही त्यांनी लक्ष वेधले.

उद्घाटनपर भाषणात रिजिजू यांनी प्रलंबित प्रकरणाविषयी महत्त्वाच्या मुदा समोर आणण्याबरोबरच लोकांना न्याय देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात चांगला समन्वय पाहिजे, असे मत मांडले. श्रीमंत आणि सधन लोकांना चांगले वकील मिळतात. वकीलांकडून सुनावणीसाठी १० – १५ लाख रुपये आकारले जात असतील तर ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. न्यायाचे दरवाजे सर्वांसाठी समान खुले असले पाहिजे असेही रिजिजू यावेळी म्हणाले.

Legal cases Pending Figures in Indian Courts


Previous Post

पडल्या पडल्या गाढ झोप हवी आहे? फक्त हे करा

Next Post

मॅट्रिमोनिअल साईट्सवर या महिलांना आहे सर्वाधिक पसंती

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मॅट्रिमोनिअल साईट्सवर या महिलांना आहे सर्वाधिक पसंती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group