India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मॅट्रिमोनिअल साईट्सवर या महिलांना आहे सर्वाधिक पसंती

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्या मुली, महिला नोकरी करतात त्यांना मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवर मॅच किंवा जोडीदाराकडून फारशी पसंती मिळत नसल्याचे एका अभ्यातासून समोर आले आहे. तर ज्या महिला नोकरी करत नाही त्यांना १५ ते २२ टक्के अधिक पसंती असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

दिवा धर यांनी हे सर्वेक्षण केले असून त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ब्लावात्निक स्कूल ऑफ गव्हर्नमेन्टमध्ये डॉक्टरल कॅन्डिडेट आहेत. त्यांना नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांबाबत आणि नोकरी न करणाऱ्या महिलांबाबत अभ्यास करायचा होता. या अभ्यासाद्वारे त्यांना लग्न जुळवताना नेमकी पसंती कुणाला मिळते, त्यामागची कारणं काय आहेत, नोकरी करणाऱ्या महिलांना मॅट्रिमोनिअल साईट्सवर लग्न जुळवताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, या प्रश्नांची उकल त्यांनी या अभ्यासातून केली.

या सर्वेक्षणसाठी त्यांनी २० बनावट प्रोफाईलही मॅट्रीमोनिअल साईट्सवर तयार केले होते. यात त्यांनी वय, लाईफस्टाईल, आवडी, निवडी या सगळ्या गोष्टी सारख्या ठेवून फक्त तीन मुद्द्यांमध्ये फरक केला. तुमचा जोडीदार नोकरी करणारी असावी का, जोडीदाराने भविष्यातही नोकरी करावी का, किती पैसे कमवावेत, या तीन प्रश्नांबाबतची माहिती बनावट प्रोफाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भरली. नेमका कोणत्या प्रोफाईलला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत लग्नसाठी ७८ – ८५ पुरुष हे कधीही काम किंवा नोकरी केलेल्या महिलांना अधिक पसंती देत असल्याचे हा अभ्यास सांगतो. त्यामुळे ऑनलाईन लग्न जुळवणाऱ्या साईट्सवर महिलांकडे पाहण्याचा नेमकी दृष्टीकोन कसा असतो, याबाबतही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिले आहे.

लग्नानंतर नोकरी करु इच्छिणाऱ्या महिलांचा पगार हा फार मोठी भूमिका बजावत असल्याचेही यातून समोर आले. अशा महिलांना पुरुषांची पसंती मिळते. परंतु, नोकरी न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत जास्त कमावणाऱ्या महिलांना पसंती देण्याची शक्यता १० टक्के कमी आहे. तर पुरुषांपेक्षा कमी कमावणाऱ्या महिलांना जास्त पसंती मिळण्याची शक्यता १५ टक्के आहे. ९९ टक्के महिला या वयाच्या ४०व्या वयापर्यंत लग्न करतात. आपली नोकरी लग्नात अडथळा ठरत असेल, तर महिला ते सोडण्याला पसंती देतात.

Matrimonial Websites Women’s Preference Survey Report


Previous Post

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत तब्बल एवढे खटले; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Next Post

या फळांच्या बिया असतात विषारी; खाल्ल्यास बिघडू शकते तुमचे आरोग्य

Next Post
संग्रहित फोटो

या फळांच्या बिया असतात विषारी; खाल्ल्यास बिघडू शकते तुमचे आरोग्य

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group