India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जळगावातील तरुणाचे अनोखे आंदोलन… राज्यभरात होतेय चर्चा.. असं काय केलं त्याने

India Darpan by India Darpan
May 13, 2023
in राज्य
0

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपला देश हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र शेतकरी तरुणांना सद्यस्थितीत लग्नासाठी वधू मिळेनाशी झाली आहे. याच माध्यमातून अनेकदा विवाहच्छुक तरुणांनी आंदोलन देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर या सामाजिक समस्यकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने डोक्यावर टोपी, पांढरे कपडे परिधान करून डोक्याला मुंडावळ्यादेखील बांधल्या. या आंदोलनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.

शेतकरी मुलांनी तरी कुठे जावे, सामाजिक प्रश्न निर्माण शेतकरी मुलांना स्थळे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुली देखील शेती करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. नोकरदार मुलगा असला तरी क्लास वन, क्लास टू शासकीय अधिकारी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. मुलांना आई वडील असतील तर मुले मुंबई, पुणे, औरंगाबाद असावेत, अशी अपेक्षा असते. शेतकरी हा खरे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत हे तितकेच खरे आहे. अनेकदा मुली लग्नास तयार असतात, मात्र शेतीत काम करणारा नको, असे सांगतात. असेच सुरू राहिले तर शेतकरी मुलांनी कुठे जावे, हा सामाजिक प्रश्न आहे.

सध्या मुलींना मुलाकडे शेती हवी असली तरी त्या स्वत: शेतात जाण्यासाठी तयार नसल्याचे आजचे चित्र आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे.’आपण मेहनती व सधन बागाईतदार असून आपल्याला बागायतदारीणच म्हणजे शेतात काम करणारी बायको हवी!’ असे जाहीर करून त्याने सामाजिक प्रश्नाला वाचा फोडली आहे .

पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा गावच्या पंकज राजेंद्र महाले नामक या तरूणाने आपल्या अनोख्या आंदोलनातून उत्तर दिले आहे. बीएस्सी अॅग्रीकल्चरचे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याची गावात दहा एकर बागायत अर्थात पाण्याची मुबलकता असलेली जमीन आहे. सध्या नोकरी नसल्याने तो बेरोजगार असून, घरच्या शेतीची मशागत करतो. मात्र केवळ शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही. यामुळेहीच समस्या अनेक तरुण शेतकऱ्यांचीदेखील आहे. शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहत असल्याने मुली मिळत नाही.

Jalgaon Youth Agitation Wedding Serious Issue


Previous Post

डीआरडीओच्या प्रदीप कुरुलकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Next Post

आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारणार मराठमोळा देवदत्त नागे; घेतलं एवढं मानधन

Next Post

आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारणार मराठमोळा देवदत्त नागे; घेतलं एवढं मानधन

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group