India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारणार मराठमोळा देवदत्त नागे; घेतलं एवढं मानधन

India Darpan by India Darpan
May 13, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला चित्रपट म्हणजे ‘आदिपुरुष’. मराठमोळ्या ओम राऊतनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्यामध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली असून, त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे याने यात हनुमानाची भूमिका साकारली आहे.

ही भूमिका माझी ड्रीम भूमिका
ही भूमिका मिळणं हे मारुतीरायाचीच कृपा असल्याचं अभिनेत्याने यावेळी म्हटलं. ही भूमिका आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तेही देवदत्तने यावेळी सांगितलं. भूमिका आणि चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी देवदत्तनं सांगितलं, ‘हा चित्रपट आणि त्यात मी साकारत असलेली भूमिका माझ्यासाठी मानधन, प्रसिद्धीच्या पलीकडची आहे. ज्या शरीरयष्टीमुळे मला ओळखलं जातं; त्याचं सगळं श्रेय मारुतीरायाचं आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी व्यायाम करतोय. त्यामागची प्रेरणा मारुतीरायाच आहेत. लहानपणापासून प्रभू रामाच्या आणि मारुतीरायाच्या स्मरणानं माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे या चित्रपटात मला हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.’

मल्टीस्टारर आणि बिग बजेट चित्रपट
‘आदिपुरुष’ या चित्रपटातील व्हिएफएक्स तंत्रज्ञानाच्या वापरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आधी हा सिनेमा यावर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव तो आता जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे बजेट ५५० कोटी रुपये एवढे आहे. मल्टी स्टार्सचा समावेश असलेला हा मेगा बजेट चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रभासचे एवढे आहे मानधन
या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी प्रभासपासून सैफ अली खानपर्यंत अनेक कलाकारांनी फी म्हणून मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी या कलाकारांना किती शुल्क दिले ते जाणून घेऊया. ‘आदिपुरुष’मध्ये रामची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता प्रभासला मोठी रक्कम मिळाली आहे. या चित्रपटासाठी प्रभासने सर्वाधिक १५० कोटी रुपये मानधन घेतले आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी जवळपास १२ कोटी रुपये घेतले आहेत. अभिनेता देवदत्त नागे याने या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला किती मानधन देण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ट्रेलरमध्ये त्याची भूमिका खूपच दमदार दिसत आहे.

Adipurush Movie Actor Devdatta Nage Fees


Previous Post

जळगावातील तरुणाचे अनोखे आंदोलन… राज्यभरात होतेय चर्चा.. असं काय केलं त्याने

Next Post

रामायण यात्रा दर्शन (भाग -२१)…  धनुषकोडी… रामाने बांधला समुद्रावर सेतू… असे आहे हे ठिकाण

Next Post

रामायण यात्रा दर्शन (भाग -२१)...  धनुषकोडी... रामाने बांधला समुद्रावर सेतू... असे आहे हे ठिकाण

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group