India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

डीआरडीओच्या प्रदीप कुरुलकरांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

India Darpan by India Darpan
May 13, 2023
in संमिश्र वार्ता
0
DRDO Scientist Pradip Kurulkar

DRDO Scientist Pradip Kurulkar


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना सध्या एटीएस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कुरुलकर यांना पुणे सत्र कोर्टाने १५ मे पर्यंत एटीएस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच त्यांच्यावर खटला भरण्यात आला असून त्यांचा कसून तपास केला जात आहे. रॉकडूनही कुरुलकरांची चौकशी केली जात आहे.

चौकशीतून अनेक मोठे गौप्यस्फोट समोर येण्याची शक्यात वर्तवली जात आहे. मात्र याचवेळी दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे यावरून संघाला लक्ष्य करण्यात येत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात कुरुलकर स्वत:च संघाशी लहानपणापासून संबंधित असल्याचा दावा करताना दिसत आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात ट्वीट करताना सत्ताधारी आणि संघावर टीका केली आहे. काही संस्था तथा पक्षाशी संबंधित लोक दररोज अनेक भारतीयांना पाकिस्तानात जा, म्हणत धमकावत होते, ते आता स्वत:च पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडले गेले आहेत. तसेच मी देशाला झुकू देणार नाही’ म्हणणाऱ्यांच्या राष्ट्रवादाचे सत्य असेही खरगे यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे खरगे यांनी या ट्वीटमध्ये कुरुलकरांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात कुरुलकर एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगताना दिसत आहेत. माझा मुलगा आता संघ कार्यात जातो. काही प्रमाणात सहभागी होतो. ही आमच्या घरातली चौथी पिढी आहे. माझे आजोबा शाखेत जायचे. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले असून ते अतिशय चांगले गणिती होते. त्यांचे हिशोब पक्के होते. त्यामुळे शाखेचा निधी ठेवणे, त्याचा हिशोब ठेवणे असे काम त्यांच्याकडे असे. त्यानंतर ते काम कालानुरूप माझ्या वडिलांकडेही ती जबाबदारी आली. १९८२ ते १९९६ या १४ वर्षांच्या काळात मी पुण्याच्या शाखेत सॅक्सोफोन वाजवत होतो, असेही कुरुलकर या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. त्यामुळे आता या व्हिडिओवरून खळबळ उडाली आहे.

जो लोग आये दिन, हम हिन्दुस्तानियों को “Go To Pakistan”, “Go to Pakistan” कहकर धमकाते हैं …

वो अब खुद Pakistan की जासूसी करते पकड़े गये हैं।

ये है “मैं देश नहीं झुकने दूँगा” वालों के “राष्ट्रवाद” की सच्चाई! pic.twitter.com/owFGBbC6Zl

— Mallikarjun Kharge (@kharge) May 12, 2023

DRDO Director Pradip Kurulkar Video Viral


Previous Post

‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप; अभिनेत्रीने शेअर केला हा व्हिडीओ

Next Post

जळगावातील तरुणाचे अनोखे आंदोलन… राज्यभरात होतेय चर्चा.. असं काय केलं त्याने

Next Post

जळगावातील तरुणाचे अनोखे आंदोलन... राज्यभरात होतेय चर्चा.. असं काय केलं त्याने

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group