India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गौतम अदानींभोवती कर्जाचा सापळा! डोक्यावर आहे एवढे जबरदस्त कर्ज, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

India Darpan by India Darpan
February 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंडेनबर्ग रिसर्चने समोर आणलेल्या नकारात्मक अहवालामुळे गौतम अदानी आणि संपूर्ण अदानी समूहाच अडचणीत आला आहे. त्यानंतर सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आता निक्केई आशियाने नवा खुलासा केला आहे. त्यात गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्यांवरील एकूण कर्ज ३.३९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे कर्ज भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात १ टक्के इतके आहे. त्याचा अर्थ गौतम अदानी कर्जाच्या सापळ्यात पुरते अडकले आहेत.

निक्केई आशियाच्या अहवालानुसार, अदानी समूहाने गेल्या वर्षी एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि नवी दिल्ली टेलिव्हिजनसह तीन कंपन्या खरेदी केल्या. यामुळे समूहावरील कर्जामध्ये वाढ झाली असून एकूण अर्ज ३.३९ ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, ऑक्टोबरच्या अखेरीस भारताचा नाममात्र जीडीपी २७३ ट्रिलियन रुपये इतका होता. याचा अर्थ अदानींवरील कर्ज हे देशाच्या जीडीपीच्या १.२ टक्के इतके आहे.

गुंतवणूकदार चिंतेत
अदानी समूहाच्या १० कंपन्यांचे सामूहिक शेअर्सचे प्रमाण २५ टक्के होते. निक्केई अहवालातील नमूद माहितीनुसार अदानी ग्रीन एनर्जीचा इक्वीटी रेशो मार्च २०२२ पर्यंत फक्त २ टक्के इतके होते. याचाच अर्थ १० समूह कंपन्यांकडे ४.८ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. मात्र एवढ्या मोठ्या कर्जामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या सात लिस्टेट कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये १०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली होती. त्यात आता नवा नकारात्मक अहवाल आल्याने गुंतवणूकारांच्या चिंतत भरच पडली आहे.

Industrialist Gautam Adani Loan Amount Debt Banks


Previous Post

एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतील प्रकल्पात भ्रष्टाचार; भाजप आमदाराचाच आरोप

Next Post

ही लोकशाही आहे का? राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न आणि भाषणाचा काही भाग वगळला; नियम काय सांगतो?

Next Post

ही लोकशाही आहे का? राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न आणि भाषणाचा काही भाग वगळला; नियम काय सांगतो?

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group