नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात आज मालेगाव, येवला, मनमाडसह अन्य ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनूस्मृती दहनाच्या वेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याने आक्रमक झालेल्या भाजपाने त्यांच्या निषेर्धात आंदोलन केले असून मालेगाव मध्ये भाजप पदाधिका-यांनी मोसमपुला जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या फोटोचे दहन करत निषेध व्यक्त केला.