India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अवघा आठवी पास मजूर घरातच छापायचा चक्क बनावट नोटा; असा सगळा होता त्याचा कारभार

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पैशाचे झाड नसते पण बनावट नोटा तयार करून त्या चलनात किंवा बाजारात आणण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. सर्व समाजासाठी अत्यंत धोकादायक आणि देशाच्या विकासाला घातक ठरणार हा गैरप्रकार बंद व्हावा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येतात. तरीही गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून बनावट नोटा छापण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळेच सुमारे पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने याला पायबंद बसावा म्हणून नोटाबंदी जाहीर केली होती. परंतु त्यानंतर ही बनावट नोटाचे प्रकार काही कमी झालेले दिसून येत नाही. विशेषतः पैसे 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. साहिबााबाद पोलिसांनी आठवी पास मजूर खुशी मोहम्मद याला अर्थला येथील पेट्रोल पंपावरून बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यात अटक केली.

विशेष म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याच्या इच्छेने तो यूट्यूबवरून शिकून गिरधरपूर बदलपूर येथील भाड्याच्या घरात या नोटा छापत होता. खुशी मोहम्मद हा दिवसा मजूर म्हणून काम करायचा आणि रात्री नोटा छापायचा. त्याने 500, 200 आणि 100 रुपयांच्या 94 हजार मूल्यांच्या नोटा छापल्या होत्या. पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्याने बनावट नोटा छापून पोलिसांना दाखविले. नोटा चालवण्यासाठी ज्याला आपला एजंट बनवायचा होता, त्याने पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि नोटा बदलून घेण्यासाठी तो पेट्रोल पंपावर पोहोचताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून 9400 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्याच्या घरातून प्रिंटर, कटर, टेप आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. एसपी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, खुशी मोहम्मद हा मूळचा बदाऊन जवळील उनाखचा रहिवासी आहे. तो काही काळ गिरधरपूरमध्येही राहत होता.

Eighth Pass Laborer Duplicate Notes Printing Crime Police Delhi Ghaziabad


Previous Post

मृतदेहानेच फोडली खूनाला वाचा; पोलिसांनी असा लावला छडा

Next Post

पुरस्कार विजेते डिसले गुरुजी सध्या का आलेत चर्चेत? काय आहे वाद? असं काय केलं त्यांनी? वाचा सविस्तर…

Next Post

पुरस्कार विजेते डिसले गुरुजी सध्या का आलेत चर्चेत? काय आहे वाद? असं काय केलं त्यांनी? वाचा सविस्तर...

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group