इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, पोलीस अगदी कोणत्याही गुन्ह्याचा छोटा पुरावा मिळाला तरी गुन्हेगारापर्यंत माघ काढतात, इतकेच नव्हे तर दफन केलेला मृतदेह देखील गुन्ह्याला वाचा फोडू शकतो, हे इतके सर्व सांगण्याचे कारण म्हणजे किरकोळ किरकोळ कारणातून एका पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि वादाचे पर्यावरण मोठ्या भांडणात झाले. त्यातून पत्नीने चक्क आपल्या पतीचा गळा दाबून खून केला आणि इतकेच नव्हे तर त्याचा दफनविधी देखील केला. या भयानक घटने मुळे राजस्थानमध्ये सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फतेहपूर शेखावती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर हे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. सुरुवातीला या पुरुषाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून त्याचा दफनविधी करण्यात आला होता. पण या महिलेवर तिच्या सासूने संशय घेतला. त्यानंतर तिनेच हत्या केल्याची बाब उघडकीस आली. हत्येनंतर आठ दिवसांनी पोलिसांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढून तपास केला. या तपासातून महिलेचे गैरकृत्य उघड होताच तिने चौकशीत पतीच्या हत्येबाबत कबुली दिली.
पोलिसांनी सांगितले की, फतेहपूर शेखावटी येथील रहिवासी मकसूदचा सुमारे सहा वर्षांपूर्वी आरोपी महिला मदिनासोबत विवाह झाला होता. तो मकसूद गावातच दागिने बनवण्याचे काम करायचे. मात्र त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते. तो पत्नीसमोरच त्या महिलेशी अश्लील गप्पा मारायचा. मदीनाला पतीच्या या कृत्यांचा खूप राग आला होता. त्याच रागातून ती अनेक दिवसांपासून पतीला मारण्याची योजना आखत होती. आरोपी मदिना ही पती मकसूद आणि सासूसोबत एका गावात लग्नाला गेली होती.
त्यानंतर लग्न आटोपून घरी परतला. त्यानंतर त्यावेळी घरात फक्त मदिना आणि तिचा पती मकसूद हे दोघेच होते. मकसूदला घरात झोपलेले पाहून मदीनाने आधी साडीने त्याचा गळा दाबला. मात्र त्याची तडफड सुरू होती तो जिवंत असल्याची पाहून त्यानंतर मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. मात्र पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे मदिनाने भासवले. मकसूदचा लहान भाऊ मुस्तफा सांयकाळीघरी परतला तेव्हा मदीनाने त्याला मकसूदने आत्महत्या केल्याचे सांगितले.
पोलिसांच्या चौकशीच्या भितीने कुटुंबीयांनी मकसूदला कब्रस्तानात पुरले होते. काही दिवसांनंतर मदिनावर तिच्या सासूने संशय घेतला. त्याआधारे पोलिसांनी मदीनाची चौकशी केली. त्यात तिने घाबरून पतीच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले. त्यानंतर मकसूदचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला होता.
पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यावर हत्येचा कट उघड झाला आणि पोलिसांनी त्याची पत्नी मदीनाला अटक केली. मदीना हिचे परिसरातील एका ग्रामीण डॉक्टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या सासूने केला होता. मकसूदच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मदीना आणि डॉक्टर यांनी मिळून मुलाची हत्या केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Crime Murder Dead Body Investigation Police