India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुरस्कार विजेते डिसले गुरुजी सध्या का आलेत चर्चेत? काय आहे वाद? असं काय केलं त्यांनी? वाचा सविस्तर…

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही काळात जागतिक पुरस्कार विजेते वादग्रस्त शिक्षक रणजितसिंह डिसले सातत्याने चर्चेत आहेत. शाळेत गैरहजर असणे, पुरस्काराचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी न करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात केल्या जात आहेत. आता त्यांनी ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन स्वत:च मंजूर केल्याची धक्कादायक बाब चौकशी अहवालातून समोर आली आहे.

जागतिक पुरस्कारामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले प्रकाशझोतात आले. त्यानंतर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर त्यांची नेमणूक झाली. पण ते तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शाळेतही उपस्थित राहिले नाहीत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रत्यक्षात ३४ महिने शाळेत किंवा प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात त्यांनी जाणे अपेक्षित होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर डिसलेंनी ३४ महिन्यांचे जवळपास १७ लाख रुपये वेतन मिळवल्याचे समोर आले असून आता ते वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच डिसले गैरहजर असताना त्यांना वेतन मिळालेच कसे, वेतन कुणाच्या परवानगीने दिले गेले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. डिसले यांनी या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून गैरहजर असताना स्वत:चे वेतन स्वत:च मंजूर केल्याचे आतापर्यंत समोर येत आहे. त्यामुळे चौकशी समितीने नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका डिसले यांच्यावर ठेवला आहे.

हा आहे आरोप
मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवत डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केली आहे तसेच स्वत:च्या अधिकारात अनधिकृतपणे त्यांनी स्वत:च्या वेतनाची उचल केली आहे, असे आतापर्यंतच्या अहवालातून समोर आले आहे. डिसले यांना वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर होण्यासाठी नियमानुसार परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसलेंनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाचा संपूर्ण भार तेथील सेवाज्येष्ठ शिक्षक कदम यांना दिला. मात्र आर्थिक व्यवहार स्वत:कडेच ठेवले. यातूनच त्यांनी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे अहवालात म्हणले आहे.

स्वाक्षरीतही फरक
तसेच त्यांच्या स्वाक्षरीमध्येही अनेक ठिकाणी फरक असून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची स्वाक्षरी केल्याचे दिसून आले आहे. १३ नोव्हेंबर २०१७ ते ५ मे २०२० या कालावधीत परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूरचे सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक इत्यादीपैकी एकही अधिकृत नोंद उपलब्ध झाली नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करू शकले नाहीत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Award Winner Teacher Ranjitsinh Disle and His Controversy detail report

 


Previous Post

अवघा आठवी पास मजूर घरातच छापायचा चक्क बनावट नोटा; असा सगळा होता त्याचा कारभार

Next Post

यंदा खरंच मंदी आहे का? बलाढ्य गुगलचे काय म्हणणे आहे?

Next Post

यंदा खरंच मंदी आहे का? बलाढ्य गुगलचे काय म्हणणे आहे?

ताज्या बातम्या

येवल्यातील हुडको वसाहतीत पावसाचे पाणी घुसले; घरांना तलावाचे स्वरूप.. (व्हिडिओ)

August 7, 2022

निखत जरीनचा ‘सुवर्ण’पंच! भारताची सुवर्णपदक संख्या झाली १७

August 7, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींचे ठरेल शुभ कार्य; जाणून घ्या सोमवारचे (८ ऑगस्ट) राशिभविष्य

August 7, 2022

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ८ ऑगस्ट २०२२

August 7, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात

August 7, 2022

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी – लोकप्रतिनिधींच्या इच्छेतून साकारले १०४ फुटी बजरंगबली!

August 7, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group