India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यंदा खरंच मंदी आहे का? बलाढ्य गुगलचे काय म्हणणे आहे?

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या मंदी आहे की नाही याबाबत दुमत असू शकते. काहींना वाटते सध्या मंदी आहे तर काहींना वाटते मंदीच नाही. पण, या प्रश्नावर जगविख्यात गुगल कंपनी काय विचार करते हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच यासंदर्भातील विचार करुन गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदीचे सावट जगभरात असतानाच गुगलही त्याला अपवाद राहिलेले नाही. मेटा कंपनीनंतर गुगलनेही कर्मचाऱ्यांच्या भरतीला चाप लावण्याचा निर्णय यावर्षासाठी घेतला आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून ई – मेल लिहिला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.

गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी बरेच जण जीवतोड मेहनत करत असतात. त्यामुळे भरती होणार नसल्याच्या निर्णयाने अनेकजण निराश झाले आहेत. यावर्षी केवळ आवश्यक सेवा विभागासाठी कर्मचारी भरती सुरु राहील असे पिचाई यांनी नमूद केले आहे. २०२२ – २३ या वर्षांत कंपनीचा फोकस केवळ इंजिनियरिंग, तांत्रिक तज्ज्ञ आणि महत्त्वपूर्ण पदावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीवर असणार आहे. “इतर कंपन्यांप्रमाणेच आपल्यालाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असून अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. अशा आव्हानांकडे आपण संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहत आहे”, असे पिचाई यांनी ई – मेलमध्ये नमूद केले आहे.

या क्षेत्रात मात्र कर्मचारी भरती होणार
२०२२ – २३ या वर्षांत अत्यावश्यक सेवा विभागात कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग, टेक्निकल (तांत्रिक विभाग) आणि इतर आवश्यक सेवा विभागांचा समावेश आहे. दुसऱ्या तिमाहीतच आम्ही गुगलमध्ये १० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यावर्षी ठरवण्यात आलेले भरतीचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. त्यामुळेच आता उरलेल्या कालावधीत भरतीची प्रक्रिया थोडी मंदावणार आहे,’ असे पिचाई यांनी ई – मेलमध्ये लिहिले आहे.

सरकारी नोकऱ्यांचा आधार
कर्मचारी निवडणूक आयोगाद्वारे (SSC) दिल्ली पोलीस (DP), भारतीय सेनेसाठी प्रादेशिक सेना अधिकारी, भारतीय नौसेना आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड (UPRVUNL) मध्ये ५ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु होणार आहे. त्याबरोबरच यूपीएससीद्वारेही बऱ्यांच जागांसाठी भरती सुरू होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचा आधार तरुणांना मिळू शकणार आहे.

Google Big Decision Slow Down Worldwide current Situation Recruitment Vacancy Job Sunder Pichai


Previous Post

पुरस्कार विजेते डिसले गुरुजी सध्या का आलेत चर्चेत? काय आहे वाद? असं काय केलं त्यांनी? वाचा सविस्तर…

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील जन्मगावाची धक्कादायक बाब उघड

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील जन्मगावाची धक्कादायक बाब उघड

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group