नााशिक – क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणार्या टोळीचे नाशिक कनेक्शन समोर आले असून सायबर पोलिसांनी नाशिक येथून सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुर्हाडे आणि अमोल कापडणीस या तिघांना अटक केली. सद्दाम शेख हा मुख्य बुकी असून त्याचा मोबाइल हा मध्य प्रदेशातील दयाल सिंग याच्या नावे रजिस्टर असल्याचे उघड झाले आहे.
औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी- २० क्रिकेटवर सट्टा खेळणार्या अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी छापा मारून पोलिसांनी तबरेज खान, वसीम खान आणि आसेफ शेख या तिघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पाच मोबाइल, दोन दुचाकी आणि पाच हजारांची रोख रक्कम असा सुमारे एक लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यात नाशिक कनेक्शन समोर आले.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोर चौकशी केल्यानंतर फोन पे खाते अमित बुर्हाचे याच्या नावार होते. तर सद्दाम वापरत असलेला मोबाइल फोन पे अमोल कापडणीस याच्या नावावर होता. सद्दाम शेख याच्याविरुद्ध संभाजीनगरात एकूण दोन गुन्हे दाखल आहे. यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने नाशिक येथून सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुर्हाडे आणि अमोल कापडणीस या तिघांना अटक केली.